नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज

आयपीएलमध्ये जे कुणाला नाही जमलं ते लोकेश राहुलनं करून दाखवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 21:19 IST2025-05-18T21:17:37+5:302025-05-18T21:19:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 KL Rahul Record 5th Century First For Delhi Capitals Against Gujarat Titans | नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज

नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

KL Rahul 5th IPL Century : गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात करताना लोकेश राहुलनं शतकी खेळी केली. या खेळीसह त्याने आयपीएलमध्ये नवा रेकॉर्ड सेट केला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये ती वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाकडून शतक झळकवणारा तो एकमेव खेळाडू आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमधील पाचवे शतक झळकवण्याआधी त्याने लखनौ आणि पंजाब किंग्जच्या संघाकडून शतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आयपीएल कारकिर्दीतील पाचवे शतक
 

दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात लोकेश राहुलनं फाफ ड्युप्लेसिसच्या साथीनं दिल्ली कॅपिटल्सच्या संघाच्या डावाची सुरुवात केली. फाफ स्वस्तात माघारी फिरल्यावर लोकेश राहुलनं सर्व सूत्रे आपल्या हाती घेतल्याचे पाहायला मिळाले. त्याने ६५ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने नाबाद ११२ धावांची खेळी केली. 

केएल राहुलनं कोणत्या संघाकडून किती शतके झळकावली?

केएल राहुलनं  २०१९ च्या हंगामात आयपीएलमधील आपले पहिले शतक पंजाब किंग्ज संघाकडून झळकावले होते. मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याने ६४ चेडूत नाबाद १०० धावांची खेळी केली होती. पंजाबकडूनच २०२० च्या हंगामात त्याच्या भात्यातून दुसरे शतक आले. आरसीबी विरुद्ध त्याने दुबईच्या मैदानात ६९ चेंडूत नाबाद १३२ धावांची खेळी केली होती. ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.  २०२२ च्या हंगामात त्याने लखनौच्या ताफ्यातून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात दोन शतके झळकावली होती. दोन्ही सामन्यात त्याने नाबाद  १०३ धावांची खेळी केली होती. आता त्याच्या भात्यातून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना पाचवे शतक पाहायला मिळाले आहे. 

IPL 2025 : फक्त ६ जणांनी गाठलाय ५०० धावसंख्येचा पल्ला; त्यात GT च्या तिघांचा दबदबा

टी-२० क्रिकेमध्ये सर्वाधिक शतके झळकवणारे भारतीय खेळाडू

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहली ९ शतकासह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यापाठोपाठ रोहित शर्मा ८ शतकासह दुसऱ्या क्रमांकावर असून अभिषेक शर्मा आणि केएल राहुल दोघे प्रत्येकी ७-७ शतकासह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकवणारे फलंदाज

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत ८ शतके झळकावली आहेत. त्यापाठोपाठ जोस बटलरने ७ शतकासह दुसऱ्या क्रमांकावर असून ख्रिस गेलच्या ६ शतकाच्या रेकॉर्ड पाठोपाठ आता लोकेश राहुल ५ शतकासह चौथ्या क्रमांकावर आहे.

Web Title: IPL 2025 KL Rahul Record 5th Century First For Delhi Capitals Against Gujarat Titans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.