आयपीएलच्या १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं अगदी धमाक्यात सुरुवात केली. कोलकाता नाईट रायडर्सनं दिलेल्या १७५ धावांचा पाठलाग करताना किंग कोहलीनं नाबाद ५९ धावांची खेळी केली. त्याच्यासोबत सलामीला आलेल्या फिलिप सॉल्टनंही फिफ्टी ठोकली. पण आरसीबीच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो क्रुणाल पांड्या. कोलकाताचं ईडन गार्डन्सचं मैदान हे फलंदाजांसाठी नंदवन मानलं जातं. या मैदानात त्याने सामन्याला टर्निंग पॉइंट देणारा स्पेल टाकली. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेसह उप कर्णधार व्यंकटेश अय्यरला तंबूत धाडतं त्याने आपल्या संघाला मॅचमध्ये आणले. या दोन विकेट्सशिवाय त्याने तळाच्या फलंदाजीत तुफान फटकेबाजी कऱण्याची क्षमता असलेल्या रिंकू सिंहलाही आपल्या जाळ्यात अडकवले. त्याच कारणामुळे तो मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरीही ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या षटकात झाली धुलाई
भाऊ हार्दिक पांड्याप्रमाणेच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा क्रुणाल पांड्या हा गत हंगामात लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातून खेळताना दिसला होता. यावेळी तो आरसीबीकडून मैदानात उतरला आहे. पॉवर प्लेमध्ये पाचव्या षटकात त्याने या संघाकडून आपलं पहिलं षटक टाकले. ज्यात त्याला सुनील नरेन आणि अजिंक्य रहाणे या जोडीनं १५ धावा कुटल्या.
उर्वरित ३ षटकात १४ धावा खर्च करताना प्रत्येक षटकात मिळवली महत्त्वपूर्ण विकेट
त्यानंतर रजत पाटीदारनं ११ व्या षटकात पुन्हा चेंडू त्याच्या हाती सोपवला. आधीच्या षटकात सुनील नरेनची विकेट पडली होती. या संधीचा फायदा घेत क्रुणाल पांड्यानं कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला आपल्या जाळ्यात अडकले. अंजिक्य रहाणे ३१ चेंडूत ५६ धावा करून माघारी फिरला. क्रुणाल पांड्यानं घेतलेली ही विकेट आरसीबीसाठी टर्निंग पॉइंटच होती. पुढच्या दोन षटकात त्याने व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंगला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. ४ षटकांच्या कोट्यात २९ धावा खर्च करत त्याने ३ विकेट्स घेतल्या. महागडे षटक टाकल्यावर उर्वरित ३ षटकात १४ धावांत त्याने महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. याच कामगिरीमुळे तो सामनावीरही ठरला.
Web Title: IPL 2025 KKR vs RCB Virat Kohli Slams Not Out 59 In His 400th T20 Appearance But Krunal Pandya Win Player of The Match Awards
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.