यंदाच्या आयपीएलमध्ये एका पेक्षा एक थरारक लढती होत आहेत. दरम्यान, आयपीएलच्या वेळापत्रकामध्ये काही फेरबदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आयपीएलमध्ये रविवार ६ एप्रिल रोजी स्पर्धेतील १९ वा सामना कोलकाता नाईटरायडर्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात खेळवण्यात येणार होता. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर हा सामना रविवारी दुपारी ३.३० वाजता होणार होता. मात्र आता या सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे.
पुनर्नियोजित वेळापत्रकानुसार हा सामना आता मंगळवार ८ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता खेळवण्यात येणार आहे. कोलकाता पोलिसांनी सणवार असल्याने बंगाल क्रिकेट संघटनेला या सामन्याच्या वेळापत्रकमध्ये बदल करण्याची सूचना केली होती. त्यानंतर बीसीसीआयने या सामन्याचं वेळापत्रक बदललं आहे.
वेळापत्रकामधील बदलामुळे आता आयपीएलमध्ये ६ एप्रिलऐवजी ८ एप्रिल रोजी डबल हेडर (दोन सामने) खेळवले जातील. कोलकाता नाईटरायडर्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील सामन्यानंतर त्याचदिवशी संध्याकाळी न्यू चंडीगड येथे पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील लढत होणार आहे.
Web Title: IPL 2025: IPL schedule changed, date of this match changed, reason also revealed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.