अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात टॉपरचं स्वप्न बाळगून मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्स संघासमोर गुणतालिकेत तळाला असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने धमाकेदार बॅटिंगचा नजराणा पेश केला. आतापर्यंतच्या हंगामातील सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग असो वा धावांचा पाठलाग करायचा असो चेन्नई सुपर किंग्जचा संघ अडखळताना दिसला होता. पण अखेरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने कमालीचे तेवर दाखवत गुजरात टायटन्स विरुद्धची लढाई २०० पारची केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलामीवीर डेवॉन कॉन्वेसह ब्रेविसचं अर्धशतक
सलामीवीर डेवॉन कॉन्वेसह डेवॉल्ड ब्रेविसनं केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २३० धावा केल्या आहेत. प्लेऑफ्समध्ये स्थान पक्के केलेल्या गुजरातच्या संघाला गुणतालिकेत टॉपला राहून क्वालिफायरमध्ये खेळायचे असेल तर २३१ धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवावा लागेल.
IPL 2025 : MS धोनी येईल अन् पुन्हा येणार की, नाही हा प्रश्न सोडून जाईल!
चेन्नईच्या संघाकडून शेवटच्या सामन्यात दिसली बॅटिंगमधील पॉवर
महेंद्रसिंह धोनीनं यंदाच्या हंगामातील शेवटच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आयुष म्हात्रे आणि डेवॉन कॉन्वे या जोडीनं कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. आयुष म्हात्रे १७ चेंडूत २०० च्या स्ट्राइक रेटसह ३४ धावा करून माघारी फिरल्यावर त्याच्या जागी आलेल्या उर्विल पटेल याने धमाकेदार फटकेबाजी केली. त्याने १९ चेंडूत ३७ धावा कुटल्या. शिवम दुबे ८ चेंडूत १७ धावा करून माघारी फिरला. डेवॉन कॉन्वेनं ३५ चेंडूत ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. मग डेवॉल्ड ब्रेविसनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने २३ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. डावातील अखेरच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. पण तोपर्यंत चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा बॅटिंगमधील पॉवर दाखवत धावफलकावर २३० धावा लावल्या होत्या.
Web Title: IPL 2025 GT vs CSK Brevis Conway Fifties Power Chennai Super Kings Set 231 Target against Gujarat Titans
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.