पहिल्या पराभवानंतर पंतवर आली KL राहुल सारखी वेळ? संजीव गोएंकासोबतचा फोटो व्हायरल

लखनौ नवाबांची खराब सुरुवात, संघाच्या पराभवानंतर संघ मालक अन् कॅप्टन रिषभ पंत यांचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 00:54 IST2025-03-25T00:20:53+5:302025-03-25T00:54:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 DC vs LSG Sanjiv Goenka And Rishabh Pant Having A Chat After Lucknow Super Giants Defeat Against Delhi Capitals Pics Goes Viral | पहिल्या पराभवानंतर पंतवर आली KL राहुल सारखी वेळ? संजीव गोएंकासोबतचा फोटो व्हायरल

पहिल्या पराभवानंतर पंतवर आली KL राहुल सारखी वेळ? संजीव गोएंकासोबतचा फोटो व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 DC vs LSG Sanjiv Goenka And Rishabh Pant Having A Chat Viral Pics :  आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या रिषभ पंतसाठी नव्या लखनौ सुपर जाएंट्स संघाकडूनची नवी सुरुवात खराब झालीये. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याला खातेही उघडता आले नाही. एवढेच नाही तर २१० धावांचे टार्गेट सेट करूनही संघाच्या पदरी पराभव आला. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं लखनौच्या  तोंडचा घास हिसकावून घेतल्याचे पाहायला मिळाले. या पराभवानंतर रिषभ पंतचे संघ मालक  संजीव गोएंका यांच्यासोबतचे मैदानातील फोटो व्हायरल होताना दिसत आहे. हे फोटो गत हंगामातील LSG संघाचा तत्कालीन कर्णधार लोकेश राहुल आणि संजीव गोएंका यांच्यातील जुन्या चर्चित गोष्टीला उजाळा देणारे असे आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

केएल राहुलनंतर LSG संघ मालकाच्या निशाण्यावर आला पंत?  पराभवानंतर दोघांचे फोटो व्हायरल

विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात लखनौच्या संघानं दमदार फटकेबाजीनंतर गोलंदाजीतही कमालीची कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला अडचणीत आणले होते. पण दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील आशुतोष शर्मा आणि विपराज निगम या दोघांनी आश्वासक खेळी करत लखनौच्या हातून सामना अक्षरश: हिसकावून घेतला. तोंडचा घास हिरावण्याचा प्रकार घडल्यामुळे संघ मालक नाराज होणं स्वाभाविक आहे. त्यात संजीव गोएंका हे इतर संघ मालकांच्या तुलनेत अधिक संतप्त होतात. याआधीही ही गोष्ट पाहायला मिळाली आहे. गत हंगामात लोकेश राहुलच्या बाबतीत जे घडलं तसाच काहीसा प्रकार यावेळी पंतबाबत घडला का?  नवा कॅप्टन रिषभ पंत अन् संघ मालकांमध्ये काय बोलणं झालं?  पराभवानंतर नाराजी व्यक्त करताना त्यांनी पंतला सुनावलं का? असे अनेक प्रश्न व्हायरल फोटोवरून सोशल मीडियावर उपस्थितीत केले जात आहेत.

Ashutosh Sharma नं फिरवली मॅच; पंतच्या LSG नवाबांसमोर दिल्लीकरांनी रचला इतिहास

याआधी केएल राहुल-संजीव गोएंका यांच्यातील मैदानातील दृश्य  गाजले

आयपीएल स्पर्धेच्या गत हंगामात लखनौ संघाचे मालक संजीव गोएंका आणि तत्कालीन कर्णधार लोकेश राहुल यांच्यातील मैदानातील एक क्षण चांगलाच व्हायरल झाला होता. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या पराभवानंतर संजीव गोएंका लोकेश राहुलवर नाराजी व्यक्त करताना स्पॉट झाले होते. हे प्रकरण चांगलेच गाजले. पुढे लोकेश राहुलनं हा संघ सोडून मेगा लिलावात उतरण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा या जुन्या  आठवणीला उजाळा मिळाला आहे.   

Web Title: IPL 2025 DC vs LSG Sanjiv Goenka And Rishabh Pant Having A Chat After Lucknow Super Giants Defeat Against Delhi Capitals Pics Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.