"धोनीबद्दल व्यक्त होताना...", शिवम दुबेच्या पत्नीची लांबलचक पोस्ट, उधळली स्तुतीसुमने

Anjum Khan Post For MS Dhoni: शिवम दुबेच्या पत्नीने महेंद्रसिंग धोनीसाठी भावनिक पोस्ट केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 01:22 PM2024-04-22T13:22:34+5:302024-04-22T13:25:36+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2024 updates Shivam Dubey's wife Anjum Khan has posted an emotional post for MS Dhoni  | "धोनीबद्दल व्यक्त होताना...", शिवम दुबेच्या पत्नीची लांबलचक पोस्ट, उधळली स्तुतीसुमने

"धोनीबद्दल व्यक्त होताना...", शिवम दुबेच्या पत्नीची लांबलचक पोस्ट, उधळली स्तुतीसुमने

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MS Dhoni News: आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग असलेला शिवम दुबे शानदार फॉर्ममध्ये आहे. धोनीच्या या शिलेदाराने मागील काही काळापासून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना आपली छाप सोडली. आयपीएलच्या सतराव्या हंगामात त्याला आतापर्यंत २४५ धावा करता आल्या आहेत. ३० वर्षीय शिवम दुबेला चेन्नईच्या फ्रँचायझीने ४ कोटी रूपयांत आपल्या ताफ्यात घेतले. चेन्नईच्या संघात आल्यापासून दुबेची शानदार खेळी सुरू आहे. चेन्नईच्या संघाचा शिलेदार असलेल्या दुबेच्या पत्नीने कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीसाठी खास पोस्ट केली आहे. दुबेची पत्नी अंजुमने लांबलचक पोस्ट करत धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला. 

अंजुम खानने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, धोनी हे नाव मी एका न्यूज चॅनेलवर ऐकले होते. तेव्हा तो नुकताच भारतीय संघाचा कर्णधार झाला होता. या आधी देखील मला क्रिकेट आवडायचे पण मी फारसे पाहत नव्हते. मात्र, मी धोनीला पाहताच तो न्यूज चॅनेल पाहत राहिली आणि संपूर्ण मुलाखत ऐकली. ती मुलाखत म्हणजे एक भावनाच होती, जी माझ्यासोबत जोडली गेली. तेव्हापासून मी क्रिकेटला नियमित फॉलो करायला सुरुवात केली. भारतात धोनीचा एकही सामना चुकवला नाही. माझ्यासाठी क्रिकेट म्हणजे धोनी आणि धोनी म्हणजेच क्रिकेट. माफ करा, मी त्यांना सर बोलू शकत नाही. पण, हाच तर त्यांचा आदर आहे की, लहान मुले देखील त्यांना माही भाई म्हणून हाक मारतात. 

अंजुम खानची भावनिक पोस्ट 
तसेच धोनी ही एक भावना असून मी आता भावनिक झाले आहे. यापूर्वी त्यांची हेअर स्टाईल पाहून मी भारावली होती. त्यांना या शैलीत पाहून मला अचानक माझे बालपण आठवले. वेळ एवढ्या लवकर कशी बदलते हा प्रश्न डोक्यात आला. माझ्यासाठी माही आजही तोच आहे, ज्याला मी माझ्या लहानपणी पाहिले आहे. 'माही है ना वो जिता देगा', हे वाक्य लगेच डोक्यात येते. तो कधी लवकर बाद झाला तरी तो माही आहे हे शब्द ऊर्जा ऊर्जा देतात. त्यांच्याप्रती माझ्या असलेल्या भावना त्यांना समजावू शकत नाही. धोनीच्या नेतृत्वात भारताने प्रथम ट्वेंटी-२० आणि मग वन डे विश्वचषक जिंकला. तेव्हापासून मी आजही त्यांच्यासाठी लहानच आहे. माझ्या प्रार्थनांना अखेर यश आले अन् शिवम दुबेच्या रूपात धोनीला जवळून अनुभवता आले. मी सामन्यादरम्यान शिवमला जेवढी चीअर करते त्याहून अधिक धोनीला चीअर करते... कारण ती एक वेगळीच भावना आहे, अशा शब्दांत दुबेच्या पत्नीने धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला.

 

"शिवमला माहिती आहे की, धोनी माझ्यासाठी काय आहे. मी आजही धोनीची एक झलक पाहून इतरांप्रमाणे खूप आनंदीत होते. मनात एक भीती होती की, जी व्यक्ती लहानपणापासून आपली आदर्श आहे ती प्रत्यक्षात कशी असेल? पण, धोनी हा किती वेगळा माणूस आहे हे त्यांना मी भेटून पाहिले आहे. शिवम दुबेने धोनीच्या संघातून खेळावे ही माझी इच्छा होती, जेणेकरून तो माहीकडून खूप काही शिकेल", असेही अंजुम खानने म्हटले. खरं तर अंजुमने संबंधित पोस्ट इंस्टा स्टोरीवर ठेवत धोनीला मांडताना जागाच उरली नसल्याचे म्हटले. 

Web Title: ipl 2024 updates Shivam Dubey's wife Anjum Khan has posted an emotional post for MS Dhoni 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.