'बाप'लेक धोनी फॅन! मुलीच्या शाळेची फी थकवली; पण माहीसाठी खर्च केले ६४ हजार

MS Dhoni News: महेंद्रसिंग धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 07:33 PM2024-04-12T19:33:43+5:302024-04-12T19:36:22+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Updates former csk captain MS Dhoni Fan spends 64000 for match ticket, watch here video | 'बाप'लेक धोनी फॅन! मुलीच्या शाळेची फी थकवली; पण माहीसाठी खर्च केले ६४ हजार

'बाप'लेक धोनी फॅन! मुलीच्या शाळेची फी थकवली; पण माहीसाठी खर्च केले ६४ हजार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MS Dhoni Fan: जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच... जगभरातील नामांकित खेळाडू या लीगमध्ये खेळत असतात. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो अद्याप आयपीएल खेळत आहे. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. आता कॅप्टन कूल माहीच्या एका चाहत्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. खरं तर या जबरा फॅनने धोनीची एक झलक पाहण्यासाठी मुलीच्या शाळेची फी न भरता आयपीएलचा सामना पाहण्यास प्राधान्य दिले.

चेन्नई सुपर किंग्जचा सामना पाहण्यासाठी आलेल्या एका चाहत्याने स्थानिक माध्यमाशी बोलताना भन्नाट प्रतिक्रिया दिली. त्याने चेन्नईचा सामना पाहण्यासाठी तब्बल ६४ हजार रूपये खर्च केले. त्याने सांगितले की, तिकीट मिळत नव्हते, त्यामुळे त्याने अतिरिक्त पैसे देऊन तिकीट खरेदी केले. यासाठी त्याला ६४ हजार रूपये द्यावे लागले. पण, त्याने मुलीच्या शाळेची फी न भरता ते पैसे सामना पाहण्यासाठी खर्च केले असे सांगितले. महेंद्रसिंग धोनीची झलक पाहण्यासाठी हा कारनामा केला असल्याचेही तो सांगतो. 

'बाप'लेक धोनी फॅन!
संबंधित चाहता आणि त्याच्या तीन मुलींना धोनीची झलक पाहायची होती. त्यांची ही इच्छा पूर्ण देखील झाली. पण त्यांनी मुलीच्या शाळेची फी न भरल्याची कबुली देताच सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. अनेकांनी त्यांच्या या निर्णयाला चुकीचे म्हणत सामन्यासाठी शाळेची फी थकवल्याने टीका केली. संबंधित व्यक्तीच्या मुलीने सांगितले की, माझ्या वडिलांनी या तिकिटांची खरेदी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. धोनी खेळपट्टीवर पाऊल ठेवतो तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटतो. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, या चाहत्यांनी चेन्नईची जर्सी परिधान केली आहे. 

Web Title: IPL 2024 Updates former csk captain MS Dhoni Fan spends 64000 for match ticket, watch here video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.