Join us  

कोहलीचा आणखी एक 'विराट' पराक्रम! IPL इतिहासातील ठरला चौथा ओपनर 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आजच्या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 7:52 PM

Open in App

IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आजच्या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. सनरायझर्स हैदराबाद, जो संघ विक्रमांमागून विक्रम रचतोय, त्यांच्यासमोर अडखळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहे. घरच्या मैदानावर SRH आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम पुन्हा एकदा मोडतील, असा दावा केला जात होता. RCB च्या गोलंदाजीची हालत पाहता अब की बार ३०० पार... हे नारे SRH साठी दिले गेले, परंतु RCB ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 

SRH ७ सामन्यांत ५ विजय मिळवून १० गुणांसह सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तेच RCB ला ८ पैकी एकच सामना जिंकता आला आहे आणि आज हरल्यास त्यांचे आव्हान संपल्यात जमा होणारे आहे. पॅट कमिन्सचा हा पन्नासावा आयपीएल सामना आहे, तर RCB चा हा २५० वा आयपीएल सामना आहे. मुंबई इंडियन्सनंतर असा पराक्रम करणारा तो दुसरा संघ ठरला आहे. SRH-RCB आतापर्यंत २३ वेळा समोरासमोर आले आणि त्यात हैदराबादने सर्वाधिक १३ विजय मिळवले, तर १० सामने गमावले. 

विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी RCB ला चांगली सुरुवात करून दिली. विराटने १८ वी धाव घेताच आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून ४००० हून अधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला.  या विक्रमात शिखर धवन ६३६२ ( २०२ इनिंग्ज), डेव्हिड वॉर्नर ५९०९ ( १६२) आणि ख्रिस गेल ४४८० ( १२२) हे आघाडीवर आहेत. विराटने १०७ इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडला. पण, टी नटराजने हैदराबादला पहिला धक्का दिला. फॅफ ड्यू प्लेसिस २५ ( १२ चेंडू) धावांवर झेलबाद झाला.   

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद