Join us  

IPL 2024 SRH vs RCB: RCB ने टॉस जिंकला! डुप्लेसिसला सुखद धक्का बसला; हैदराबादचे तगडे आव्हान

IPL 2024 SRH vs RCB Match Live: आज हैदराबाद आणि बंगळुरू यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 6:34 PM

Open in App

IPL 2024 SRH vs RCB Live Updates In Marathi | हैदराबाद:  आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ४१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (SRH vs RCB Live) हे संघ आमनेसामने आहेत. एक संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी तर एक संघ अगदी तळाशी आहे. आरसीबीचा संघ आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे, तर हैदराबादचा संघ दुसरे स्थान पटकावण्यासाठी मैदानात आहेत. मागील वेळी हे दोन संघ जेव्हा भिडले होते तेव्हा SRH ने ऐतिहासिक कामगिरी करत २८७ धावांचा डोंगर उभारला होता. आजच्या सामन्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (IPL 2024 News) 

नाणेफेक जिंकल्याने आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसला सुखद धक्का बसला. नाणेफेक जिंकताच डुप्लेसिसने स्मितहास्य करत बोलकी प्रतिक्रिया दिली.  हैदराबादच्या फलंदाजांचा फॉर्म पाहता त्यांनी प्रथम फलंदाजी करणं प्रतिस्पर्धी संघासाठी घातक ठरत आले आहे. सनरायझर्स हैदराबादने सातपैकी पाच सामने जिंकून १० गुण मिळवले आहेत. तर आरसीबीला केवळ एक विजय मिळवता आला आहे. आरसीबीने आठपैकी सात सामने गमावले असून त्यांच्या खात्यात केवळ दोन गुण आहेत. 

RCB चा संघ -फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमरून ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल. 

SRH चा संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्करम,  हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), निकीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार,  जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडेय, टी नटराजन. 

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर