IPL 2024 SRH vs PBKS : अर्शदीपनेच पाडला 'इम्पॅक्ट'! घातक ट्रॅव्हिस हेडला दिवसा दिसल्या चांदण्या

IPL 2024 SRH vs PBKS Live Match : आज सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 06:00 PM2024-05-19T18:00:49+5:302024-05-19T18:02:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 SRH vs PBKS Arshdeep Singh dismissed Travis Head on a golden duck, watch here video | IPL 2024 SRH vs PBKS : अर्शदीपनेच पाडला 'इम्पॅक्ट'! घातक ट्रॅव्हिस हेडला दिवसा दिसल्या चांदण्या

IPL 2024 SRH vs PBKS : अर्शदीपनेच पाडला 'इम्पॅक्ट'! घातक ट्रॅव्हिस हेडला दिवसा दिसल्या चांदण्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

SRH vs PBKS Live Score Updates । हैदराबाद: टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादचा संघ मैदानात आहे. पंजाब किंग्सने दिलेल्या २१५ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान हैदराबादला सुरुवातीलाच मोठा झटका बसला. इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात आलेल्या ट्रॅव्हिस हेडला अर्शदीप सिंगने अप्रतिम चेंडूवर बाहेरचा रस्ता दाखवला. खरे तर हेडला पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनच्या दिशेने परतावे लागले.

(IPL 2024 News) अर्शदीपने त्रिफळा काढताच पंजाबच्या शिलेदारांनी जोरदार सेलिब्रेशन केले, दुसरीकडे हेडने देखील आश्चर्य व्यक्त करताना अर्शदीपच्या चेंडूला दाद दिली. डावाच्या पहिल्या चेंडूवर चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या हेडला बाद करण्यात अर्शदीपला यश आले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आजचा सामना होत आहे. (IPL 2024 Video)

तत्पुर्वी, पंजाब किंग्सने निर्धारित २० षटकांत ५ बाद २१४ धावा केल्या. जितेश शर्माच्या नेतृत्वात खेळत असलेल्या पाहुण्या संघाला तगडी धावसंख्या उभारण्यात यश आले. अथर्व तायडे (४६), सिमरन सिंह (७१) आणि राइली रूसो (४९) या त्रिकुटाने यजमान संघाच्या गोलंदाजांना घाम फोडला. हैदराबादकडून टी नटराजनने सर्वाधिक (२) बळी घेतले, तर पॅट कमिन्स आणि वी विजयकांत यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. 

हैदराबादचा संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन, नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंह, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, वी विजयकांत. 

पंजाबचा संघ -
जितेश शर्मा (कर्णधार), राइली रूसो, प्रभसिमरन सिंह, अथर्व तायडे, शशांक सिंह, शिवम सिंह, आशुतोष शर्मा, ऋषी धवन, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर, हर्षल पटेल. 

Web Title: IPL 2024 SRH vs PBKS Arshdeep Singh dismissed Travis Head on a golden duck, watch here video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.