कोहलीचा 'विराट' पराक्रम! RCB ने नाणेफेक जिंकली अन् LSG ची कोंडी केली, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

तीन सामन्यांत २ पराभव पत्करलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आज घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सचा ( RCB vs LSG ) सामना करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 06:58 PM2024-04-02T18:58:48+5:302024-04-02T19:03:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi - Virat Kohli becomes the FIRST Indian to play 100 T20 matches at a single ground, RCB win the toss and bowl first | कोहलीचा 'विराट' पराक्रम! RCB ने नाणेफेक जिंकली अन् LSG ची कोंडी केली, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

कोहलीचा 'विराट' पराक्रम! RCB ने नाणेफेक जिंकली अन् LSG ची कोंडी केली, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi Updates - तीन सामन्यांत २ पराभव पत्करलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आज घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सचा ( RCB vs LSG ) सामना करणार आहे. विराट कोहली ( Virat Kohli) चांगल्या टचमध्ये आहे, परंतु संघाला विजय मिळवून देण्यात त्याला इतर सहकाऱ्यांकडून साथ मिळताना दिसत नाही. पण, विराटने मैदानावर उतरताच मोठा विक्रम नावावर केला आहे आणि असा एकाही भारतीयाला आतापर्यंत जमला नव्हता. 


मागच्यावेळेस जेव्हा दोन्ही संघ समोरासमोर आले होते, तेव्हा विराट व गौतम गंभीर ( तेव्हा लखनौचा मेंटॉर) यांच्यात वाद रंगलेला पाहायला मिळाला होता. RCB चे जलदगती गोलंदाज पॉवर प्लेमध्ये महागडे ठरताना दिसत आहेत आणि ही गोष्ट त्यांची चिंता वाढवतेय. LSG च्या क्विंटन डी कॉकसाठी ही जमेची बाब आहे. पण, ग्लेन मॅक्सवेलने त्याला दोन वेळा बाद केल्याने RCB त्याला पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीला आणू शकतात. 

विराट बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज १००वा ट्वेंटी-२० सामना खेळणार आहे. एकाच मैदानावर १०० ट्वेंटी-२० सामने खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने आयपीएलमधील ७ शतकांपैकी ४ शतकं चिन्नास्वामी येथे झळकावली आहेत आणि एकाच स्टेडियमवर सर्वाधिक ३२७६ धावांचा विक्रमही त्याने याच मैदानावर केला आहे.

KL Rahul आज पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत दिसला. मागच्या सामन्यात निकोलस पूरनने LSG चे नेतृत्व सांभाळले होते आणि लोकेश राहुल इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळला होता. बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. RCB ने आज प्लेइंग इलेव्हनमध्ये १ बदल केला. अल्झारी जोसेफच्या जागी रिले टॉप्ली खेळणार आहे. 

Web Title: IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi - Virat Kohli becomes the FIRST Indian to play 100 T20 matches at a single ground, RCB win the toss and bowl first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.