क्विंटन डी कॉक, निकोलस पूरनची आतषबाजी; अनुज रावत, फॅफ ड्यू प्लेसिसचे भन्नाट झेल

क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) आज पुन्हा एकदा अविश्वसनीय खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 09:12 PM2024-04-02T21:12:19+5:302024-04-02T21:12:32+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi  - Quinton de Kock Score 81 runs in 56 ball, Exceptional catch from Anuj Rawat & Faf du Plessis,  Lucknow to 181 for 5 from 20 overs | क्विंटन डी कॉक, निकोलस पूरनची आतषबाजी; अनुज रावत, फॅफ ड्यू प्लेसिसचे भन्नाट झेल

क्विंटन डी कॉक, निकोलस पूरनची आतषबाजी; अनुज रावत, फॅफ ड्यू प्लेसिसचे भन्नाट झेल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi Updates - क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) आज पुन्हा एकदा अविश्वसनीय खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांवर पहिल्या षटकापासून त्याने सुरू केलेला प्रहार १७व्या षटकात थांबला. लखनौ सुपर जायंट्सला त्याने मजबूत धावसंख्या उभी करून दिली. LSG ला आणखी जास्त धावा करता आल्या असत्या, परंतु मार्कस स्टॉयनिसच्या विकेटनंतर RCB च्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. ग्लेन मॅक्सवेलने दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. अनुज रावत व फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या अफलातून झेलचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 


RCB चा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन व लोकेश लाहुल यांनी ५३ धावांची सलामी दिली. ग्लेन मॅक्सवेलने ही भागीदारी तोडताना लोकेशला २० धावांवर माघारी पाठवले. क्विंटनने आयपीएलमध्ये आज ३००० धावांचा टप्पा ओलांडला आणि  एबी डिव्हिलियर्स व फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यानंतर हा टप्पा ओलांडणारा तो तिसरा दक्षिण आफ्रिकन खेळाडू ठरला.  क्विंटनला मार्कस स्टॉयनिसची चांगली साथ मिळाली आणि या दोघांनी २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.


मॅक्सवेलने पुन्हा फिरकीवर कमाल करताना स्टॉयनिसला ( २४) झेलबाद केले. मॅक्सवेलने ४-०-२३-२ अशी स्पेल टाकली. या विकेटनंतर लखनौच्या धावांचा वेग किंचित मंदावला. १७व्या षटकात टॉप्लीने RCB ला मोठे यश मिळवून दिले. क्विंटन ५६ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ८१ धावांवर माघारी परतला. यश दयालनेही संथ चेंडू टाकून लखनौच्या फलंदाजांना जखडून ठेवले. १९व्या षटकात निकोलस पूरनने तीन सलग षटकार खेचून LSG ला पुन्हा ट्रॅकवर आणले. निकोलसने २१ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४० धाव चोपल्या आणि लखनौला ५ बाद १८१ धावांपर्यंत पोहोचवले. 
 

Web Title: IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi  - Quinton de Kock Score 81 runs in 56 ball, Exceptional catch from Anuj Rawat & Faf du Plessis,  Lucknow to 181 for 5 from 20 overs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.