रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची तिसरी हार; LSGच्या मयांक यादवच्या वेगासमोर झाले हाल  

लखनौ सुपर जायंट्सच्या युवा गोलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांच्या घरच्या मैदानावर नांग्या टेकायला लावल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 11:03 PM2024-04-02T23:03:01+5:302024-04-02T23:09:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 : Royal Challengers Bangalore's third loss; Lucknow Super Giants won by 28 runs, Mayank Yadav Magical spell | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची तिसरी हार; LSGच्या मयांक यादवच्या वेगासमोर झाले हाल  

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची तिसरी हार; LSGच्या मयांक यादवच्या वेगासमोर झाले हाल  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi Updates - लखनौ सुपर जायंट्सच्या युवा गोलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांच्या घरच्या मैदानावर नांग्या टेकायला लावल्या. मयांक यादवच्या ( Mayank Yadav ) च्या वेगाने पुन्हा एकदा प्रतिस्पर्धींना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. देवदत्त पडिक्कल फलंदाजीत अपयशी ठरला असला तरी त्याने भन्नाट थ्रो करून फॅफ ड्यू प्लेसिसला रन आऊट केले आणि RCB चे ग्रह फिरले. त्यानंतर त्यांना संघर्ष करूनही पराभव टाळता आला नाही. 

LSG चा युवा जोश, उडाले RCB चे होश! देवदत्त पडिक्कलचा भन्नाट थ्रो अन् मयांक यादवचा वेगवान मारा, Video


विराट कोहली व फॅफ यांनी RCB ला चांगली सुरुवात करून देताना ४.२ षटकांत ४० धावा फलकावर चढवल्या. मणिमारन सिद्धार्थने LSG ला पहिला धक्का देताना विराटची ( २२) विकेट मिळवली.  एक धाव घेण्याच्या प्रयत्नात फॅफ ( १९) रन आऊट झाला. यादवने त्याच षटकात १५७ kmph च्या वेगाने चेंडू टाकून ग्लेन मॅक्सवलेला भोपळ्यावर बाद केले. त्यानंतर यादवने कॅमेरून ग्रीनचा भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडवून RCBची अवस्था बिनबाद ४० वरून ४ बाद ५८ अशी केली. रजत पाटीदार व अनुज रावत यांनी काही काळ डाव सावरला होता. पण, अनुजला ( ११) एक जीवदान मिळूनही मोठी खेळी करता आला नाही. पाटीदार ( २९) संघर्ष करत होता, परंतु मयांकच्या वेगासमोर तोही फसला अन् पडिक्कलने सुरेख झेल घेतला.


मयांकने ४ षटकांत १४ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या होत्या. दिनेश कार्तिकची विकेटही मयांकने मिळवली होती, परंतु DRS ने त्याला वाचवले. महिपाल लोमरोर सुरेख फटकेबाजी करून RCB च्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. महिपालने सामना खेचून आणलेला पाहून RCB चे फॅन्स पुन्हा प्रफुल्लीत झाले. पण, दिनेश कार्तिक ( ४) च्या विकेटने पुन्हा त्यांचे टेंशन वाढले. मयांक डागरही भोपळ्यावर रन आऊट झाला. महिपाल ही शेवटची आशाही १८व्या षटकात मावळली. यश ठाकूरने त्याला बाद केले. महिपालने १३ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३३ धावा केल्या. मोहम्मद सिराजने १९व्या षटकात सलग दोन षटकार खेचून फॅन्सला खूश केले. RCB चा संपूर्ण संघ १५३ धावांवर तंबूत परतल्याने LSG चा २८ धावांनी विजय पक्का झाला. 

 


तत्पूर्वी, क्विंटन डी कॉक आणि निकोलस पूरन यांच्या फटकेबाजीने LSGला १८१ धावांपर्यंत पोहोचवले. शेवटच्या दोन षटकांत निकोलसने उत्तुंग फटकेबाजी केली. ग्लेन मॅक्सवेलने ( ४-०-२३-२ ) RCBला दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. क्विंटन ५६ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ८१ धावांवर माघारी परतला.  पूरनने २१ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४० धावा केल्या. 

Web Title: IPL 2024 : Royal Challengers Bangalore's third loss; Lucknow Super Giants won by 28 runs, Mayank Yadav Magical spell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.