Join us  

राजस्थान रॉयल्सची मोठी खेळी; जेसन होल्डरसह ९ खेळाडू करारमुक्त, बघा कोणाला कायम ठेवले 

IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी १९ डिसेंबरला लिलाव पार पडणार आहे आणि त्यासाठी रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्याची आजची शेवटची तारीख आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 4:41 PM

Open in App

IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी १९ डिसेंबरला लिलाव पार पडणार आहे आणि त्यासाठी रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्याची आजची शेवटची तारीख आहे. चेन्नई सुपर किंग्सने २०२२मध्ये जेतेपद उंचावताना आयपीएलमध्ये सर्वाधिक ५ जेतेपदांच्या मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली होती. CSKने ८ खेळाडूंना रिलीज केले आहे. राजस्थान रॉयल्सनेही ९ खेळाडूंना रिलीज केले आहे. 

महेंद्रसिंग धोनी IPL 2024 खेळणार! CSKने ८ खेळाडूंना करारमुक्त केले, ३२.६० कोटी वाचवले 

राजस्थान रॉयल्सने रिलीज केलेले खेळाडू - जो रूट, अब्दुल बसिथ, जेसन होल्डर, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव, ओबेड मॅकॉय, मुरुगन अश्विन, केसी चरिअप्पा, केएम आसीफ( Joe Root, Abdul Basith, Jason Holder, Akash Vashisht, Kuldip Yada, Obed McCoy, Murugan Ashwin, KC Cariappa, KM Asif)

- कोणाला कायम राखले - संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोव्हॅन फेरेरा, कुणाल राठोड, आर अश्विन, कुलदीप सेन, नवदीन सैनी, युझवेंद्र चहल, अॅडम झम्पा, आवेश खान ( ट्रेड- लखनौ सुपरजायंट्स), ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, प्रसिद्ध कृष्णा

- शाहबाज अहमद हा RCB कडून सनरायझर्स हैदराबादकडे गेला आहे. त्याच्याजागी SRHने मयांक डागरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे सोपवले आहे. राजस्थान रॉयल्सने आवेश खानला आपल्या ताफ्यात घेताना देवदत्त पडिक्कलला लखनौ सुपर जायंट्सला दिले आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून रोमारिओ शेफर्डला मुंबई इंडियन्सने घेतले आहे. 

- चेन्नई सुपर किंग्सने बेन स्टोक्स ( १६.२ कोटी) , ड्वेन प्रेटोरियस( ५० लाख) , कायले जेमिन्सन ( १ कोटी), आकाश सिंग ( २० लाख), अंबाती रायुडू ( ६.७ कोटी), सिसांडा मगाला( ५० लाख) , भगत वर्मा ( ३० लाख) व शुभ्रांशू सेनापती ( २० लाख) यांना रिलिज केले आहे 

टॅग्स :आयपीएल २०२३राजस्थान रॉयल्सबीसीसीआयआयपीएल लिलाव