पृथ्वी शॉ याचं भवितव्य ठरलं! दिल्ली कॅपिटल्सने ११ खेळाडूंना रिलीज केलं, २९ कोटी वाचवले

IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी १९ डिसेंबरला लिलाव पार पडणार आहे आणि त्यासाठी रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्याची आजची शेवटची तारीख आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 04:53 PM2023-11-26T16:53:43+5:302023-11-26T16:54:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Retention: 11 Players released by Delhi Capitals: Capitals have 28.95 Crores on Purse for IPL 2024 auction | पृथ्वी शॉ याचं भवितव्य ठरलं! दिल्ली कॅपिटल्सने ११ खेळाडूंना रिलीज केलं, २९ कोटी वाचवले

पृथ्वी शॉ याचं भवितव्य ठरलं! दिल्ली कॅपिटल्सने ११ खेळाडूंना रिलीज केलं, २९ कोटी वाचवले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी १९ डिसेंबरला लिलाव पार पडणार आहे आणि त्यासाठी रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्याची आजची शेवटची तारीख आहे. चेन्नई सुपर किंग्सने ८, तर राजस्थान रॉयल्सनेही ९ खेळाडूंना रिलीज केले आहे. यांच्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची यादी समोर आली आणि त्यांनी सर्वाधिक ११ खेळाडूंना रिलीज करण्याचा मोठा निर्णय घेतला. मैदानावरील अपयश अन् मैदानाबाहेरील वादामुळे सतत चर्चेत असलेल्या पृथ्वी शॉ याला दिल्ली कॅपिटल्स रिलीज करतील अशी चर्चा होती, परंतु फ्रँचायझीने मुंबईच्या खेळाडूवर विश्वास कायम ठेवला आहे. 


दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलेले खेळाडू - रिली रोसोवू, चेतन सकारिया, रोव्हमन पॉवेल, मनिष पांडे, फिल सॉल्ट, मुस्ताफिजूर रहमान, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, सर्फराज खान, अमन खान, प्रियम गर्ग


दिल्ली कॅपिटल्सने कायम ठेवलेले खेळाडू - रिषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, यश धुल, प्रविण दुबे, विकी ओस्तवाल, एनरिच नॉर्खिया, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार.   


- राजस्थान रॉयल्सने रिलीज केलेले खेळाडूंमध्ये जो रूट, अब्दुल बसिथ, जेसन होल्डर, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव, ओबेड मॅकॉय, मुरुगन अश्विन, केसी चरिअप्पा, केएम आसीफ 


 - शाहबाज अहमद हा RCB कडून सनरायझर्स हैदराबादकडे गेला आहे. त्याच्याजागी SRHने मयांक डागरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे सोपवले आहे. राजस्थान रॉयल्सने आवेश खानला आपल्या ताफ्यात घेताना देवदत्त पडिक्कलला लखनौ सुपर जायंट्सला दिले आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून रोमारिओ शेफर्डला मुंबई इंडियन्सने घेतले आहे. 


- चेन्नई सुपर किंग्सने बेन स्टोक्स ( १६.२ कोटी) , ड्वेन प्रेटोरियस( ५० लाख) , कायले जेमिन्सन ( १ कोटी), आकाश सिंग ( २० लाख), अंबाती रायुडू ( ६.७ कोटी), सिसांडा मगाला( ५० लाख) , भगत वर्मा ( ३० लाख) व शुभ्रांशू सेनापती ( २० लाख) यांना रिलिज केले आहे
 

Web Title: IPL 2024 Retention: 11 Players released by Delhi Capitals: Capitals have 28.95 Crores on Purse for IPL 2024 auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.