Join us  

Video: पलटूराम... Live मॅचमध्ये RRच्या फॅनने बदलली जर्सी, RCBला करू लागली चीअर!

Fan changes Jersey Video, IPL 2024 RR vs RCB: कॅमेरामनने हा क्षण बरोबर टिपला. आता या तरूणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 11:23 AM

Open in App

Fan changes Jersey Video in RR vs RCB Live match: IPL 2024 मध्ये शनिवारी राजस्थान रॉयल्सच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभवाची धूळ चारली. विराट कोहलीच्या नाबाद ११३ धावांच्या जोरावर बंगळुरूने २० षटकात १८३ धावांपर्यंत मजल मारली होती. पण जोश बटलरच्या शतकापुढे त्या धावा तोकड्या पडल्या. १९.१ षटकांत राजस्थानने ते आव्हान पार केले आणि ४ पैकी ४ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. बंगळुरूला मात्र यंदाच्या हंगामात ५ पैकी ४ सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे यंदाही बंगळुरू संघाची वाट बिकट असल्याचे दिसते. तशातच या सामन्यात एका फॅनची चर्चा रंगल्याचे दिसली.

बंगळुरू संघाचे फॅन हे अतिशय प्रामाणिक असल्याचे मानले जाते. बंगळुरूच्या संघाने आतापर्यंत एकदाही IPLचे विजेतेपद जिंकलेले नाही. पण असे असले तरी बंगळुरूचे फॅन अजूनही त्यांच्याशी जोडलेले आहेत. पण समजा मैदानात असताना एखाद्या दुसऱ्या संघाची फॅन अचानक RCBची फॅन झाली तर.... असाच एक किस्सा शनिवारच्या सामन्यात घडला.

विराट कोहलीच्या शतकानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका महिला चाहत्याने तिची जर्सी बदलली. सर्वप्रथम ही महिला चाहती राजस्थान रॉयल्स संघाला चीअर करत होती. विराट कोहलीने शतक पूर्ण करताच तरूणीने अचानक पलटी मारली. तरूणीने लगेच राजस्थान रॉयल्स (RR) जर्सीवरच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) जर्सी घातली. जर्सी बदलत असताना कॅमेरामनने ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस जोडीने १२५ धावांची सलामी दिली. डु प्लेसिस ४४ धावांवर बाद झाला. मॅक्सवेल (१), सौरव चौहान (९) आणि कॅमेरॉन ग्रीन (नाबाद ५) हे फारसे खेळले नाहीत. विराटने शेवटपर्यंत नाबाद राहत ७२ चेंडूत ११३ (१२ चौकार आणि ४ षटकार) धावा केल्या. १८४ धावांचा पाठलाग करताना राजस्थानने पहिली विकेट शून्यावर गमावली. पण कर्णधार संजू सॅमसन आणि जोश बटलर जोडीने १४८ धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन ४२ चेंडूत (८ चौकार, २ षटकार) ६९ धावांवर बाद झाला. पण जोश बटलरने शेवटपर्यंत टिकून राहिला. त्याने ५८ चेंडूत मदतीने नाबाद १०० धावा ( (९ चौकार, ४ षटकार) केल्या आणि सामनावीर ठरला.

टॅग्स :आयपीएल २०२४राजस्थान रॉयल्सविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर