‘माझा हुकूम आहे, रूममध्ये लवकर ये…’ रिवाबाच्या पोस्टवरील रवींद्र जडेजाची कमेंट झाली व्हायरल  

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्सच्या आज गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात इतर खेळाडूंसोबत अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या कामगिरीकडेही सर्वांची नजर असणार आहे. दरम्यान, सामन्यापूर्वी रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर पत्नी रीवाबा जडेजा हिच्या पोस्टखाली केलेली कमेंट खूप व्हायरल होत आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 07:02 PM2024-03-26T19:02:01+5:302024-03-26T19:03:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024: Ravindra Jadeja's comment on Rivaba's post 'My order is, come to the room soon...' went viral. | ‘माझा हुकूम आहे, रूममध्ये लवकर ये…’ रिवाबाच्या पोस्टवरील रवींद्र जडेजाची कमेंट झाली व्हायरल  

‘माझा हुकूम आहे, रूममध्ये लवकर ये…’ रिवाबाच्या पोस्टवरील रवींद्र जडेजाची कमेंट झाली व्हायरल  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर मात करत आयपीएलमध्ये विजयी सुरुवात केली आहे. दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्सचा दुसरा सामना आज गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात इतर खेळाडूंसोबत अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या कामगिरीकडेही सर्वांची नजर असणार आहे. दरम्यान, सामन्यापूर्वी रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर पत्नी रीवाबा जडेजा हिच्या पोस्टखाली केलेली कमेंट खूप व्हायरल होत आहे.  

रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. तिने रवींद्र जडेजाच्या फोटोसमोर उभी राहून फोटो काढला आहे. तसेच तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच त्यासोबत तिने लाल आणि पिवळ्या हार्टची इमोजी कॅप्शनमध्ये लावली आहे. त्या पोस्टवर रवींद्र जडेजाने मजेशीर कमेंट्स केली आहे. त्यात त्याने लिहिलंय की, ‘माझा हुकूम आहे. रूममध्ये ये लवकर’. आता चेन्नईच्या या अष्टपैलू खेळाडूची ही कमेंट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे.  

या फोटोमध्ये रिवाबा पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. तसेच तिच्या टी-शर्टावर हुकूम असं लिहिलं आहे. त्यावरूनच जडेजाने गमतीदार कमेंट केली आहे. रवींद्र जडेजा आणि रिवाबा यांचा विवाह १७ एप्रिल २०१६ रोजी झाला होता. रिवाबा सध्या भाजपाची गुजरातमधील आमदार आहे. ती वेळात वेळ काढून क्रिकेट सामन्यांवेळी रवींद्र जडेजाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये येत असते. क्रिकेटच्या मैदानातील तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.

गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाने यंदाच्या आयपीएलच्या हंगामातही विजयी सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईने घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला होता. आता आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात चेन्नईची गाठ गुजरात टायटन्सच्या संघाशी पडणार आहे.   

Web Title: IPL 2024: Ravindra Jadeja's comment on Rivaba's post 'My order is, come to the room soon...' went viral.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.