Join us  

रवींद्र जडेजाने व्यक्त केली खंत... CSK ने त्वरित केलं समाधान; जड्डूला दिलं नवीन नाव

चेन्नईच्या गोलंदाजांनी बहारदार कामगिरी करून कोलकाताला १३७ धावांवर रोखले आणि त्यानंतर ७ विकेट्स राखून ही मॅच जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 3:46 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून तिसऱ्या विजयाची नोंद केली. चेन्नईच्या गोलंदाजांनी बहारदार कामगिरी करून कोलकाताला १३७ धावांवर रोखले आणि त्यानंतर ७ विकेट्स राखून ही मॅच जिंकली. या सामन्यात रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) ३ विकेट्स घेतल्या आणि त्याला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला गेला. सामन्यानंतर समालोचक हर्षा भोगले जेव्हा जडेजाशी बोलत होते, तेव्हा त्याने महेंद्रसिंग धोनी व सुरेश रैना यांना अनुक्रमे थाला व चिन्ना थाला अशी टोपण नाव दिली गेली आहेत, यांच्याप्रमाणे आपल्यालाही टोपण नाव न मिळाल्याची खंत व्यक्त केली होती. तेव्हा भोगले यांनी लगेचच त्याला 'थालापती'असे नाव दिले. पण, आता चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीनेच याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

"माझ्या टोपण नावाला अद्याप मान्यता मिळालेली नाही, आशा आहे की ती मला लवकरच मिळेल," असे जडेजा हसत हसत म्हणाला. त्याने पुढे म्हटले की,''या खेळपट्टीवर मी नेहमीच माझ्या गोलंदाजीचा आनंद घेतो. मला आशा होती की चेंडू थोडी पकड घेईल आणि जर तुम्ही योग्य भागात गोलंदाजी केली तर त्याची तुम्हाला मदत मिळेल. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांसाठी स्थिर होण्यासाठी आणि योजना आखण्यासाठी इथे वेळ लागतो."

हर्षा भोगलेने त्यांच्या सोशल मीडियावर लिहिले की, सामन्यानंतरच्या प्रझेंटेशनलाही एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक उपस्थित राहत असलेलं हे भारतातील एकमेव मैदान असेल. त्यामुळे मला इथे प्रेझेंटेशन करायला आवडतं. चेन्नई सुपर किंग्स तुम्ही जडेजाच्या 'क्रिकेट थालापती'  या नावाला मान्यता द्याल का? 

जडेजाने भोगले यांच्या पोस्टवर धन्यवाद असे लिहून आभार मानले.   चेन्नई सुपर किंग्सने त्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जडेजासाठी क्रिकेट थालापती हे नाव मान्य केले.   

टॅग्स :आयपीएल २०२४रवींद्र जडेजाऑफ द फिल्डचेन्नई सुपर किंग्स