विराट कोहलीचा 'थाट', तरीही नावावर 'संथ' ठप्पा! RCB चा आटला धावांचा 'पाट' 

विराट कोहली ( Virat Kohli) च्या शतकानंतरही RCB ला सन्मानजनक धावसंख्या उभारत्या आल्या नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 09:14 PM2024-04-06T21:14:42+5:302024-04-06T21:15:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi :  EIGHTH hundred for Virat Kohli, lowest hundreds in #IPL history, RR needs 184 runs to win  | विराट कोहलीचा 'थाट', तरीही नावावर 'संथ' ठप्पा! RCB चा आटला धावांचा 'पाट' 

विराट कोहलीचा 'थाट', तरीही नावावर 'संथ' ठप्पा! RCB चा आटला धावांचा 'पाट' 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : विराट कोहली ( Virat Kohli) च्या शतकानंतरही RCB ला सन्मानजनक धावसंख्या उभारत्या आल्या नाही. विराट व फॅफ ड्यू प्लेसि यांच्या १२५ धावांच्या सलामीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दमदार सुरुवात करून दिली. फॅफच्या धावांचा वेग जरा जास्त राहिला असता तर राजस्थान रॉयल्ससमोर ते आणखी मोठे आव्हान उभे करू शकले असते.  


राजस्थानने नाणेफेक जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजीला बोलावले.  विराट व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी १२५ धावा जोडल्या. विराटने ३९ चेंडूंत आयपीएलच्या या पर्वातील तिसरे अर्धशतक झळकावताना फॅफसह १२ षटकांत शतकी धावा उभ्या केल्या. विराट व फॅफ यांची २०२२ नंतरची ही सहावी शतकी भागीदारी ठरली. १४व्या षटकात युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर विराटचा पॉईंटवर नांद्रे बर्गरने झेल टाकला. त्याच षटकात फॅफचा सोपा झेल ट्रेंट बोल्टने टाकला. मात्र, पुढच्या चेंडूवर जॉस बटलरने झेल घेऊन १२५ धावांची ही भागीदारी तोडली. फॅफ ३३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ४४ धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल ( १) पुन्हा फेल गेला आणि नांद्रे बर्गरने त्याचा त्रिफळा उडवला. 


चहलने सामन्यातील दुसरी विकेट घेताना पदार्पणवीर सौरव चौहानला ( ९)  बाद केले. पण, विराटने पुढच्या चेंडूवर चहलचे षटकाराने स्वागत केले. पण, विराटने पुढच्या चेंडूवर चहलचे षटकाराने स्वागत केले. विराटने ६७ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने आयपीएलमधील आठवे शतक झळकावले. ट्वेंटी-२०तील एकंदर त्याचे हे नववे शतक आहे. विराटच्या शतकानंतरही RCB ला २० षटकांत ३ बाद १८३ धावाच करता आल्या. विराट ७२ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ११३ धावा केल्या. विराटने झळकावलेले शतक हे आयपीएल इतिहासातील संथ शतक ठरले. २००९ मध्ये मनिष पांडेने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध ६७ चेंडूंत शतक झळकावले होते. विराटने या संथ शतकाशी आज बरोबरी केली.  

Web Title: IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi :  EIGHTH hundred for Virat Kohli, lowest hundreds in #IPL history, RR needs 184 runs to win 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.