Join us  

SRHने कर्णधारपदी पॅट कमिन्सला निवडून चूक केली, आर अश्विनने घेतली फिरकी

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याचा निर्णय चाहत्यांना आवडलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 3:44 PM

Open in App

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद हे नव्या कर्णधारासह जेतेपदासाठी मैदानावर उतरणार आहेत. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याचा निर्णय चाहत्यांना आवडलेला नाही. त्यात SRH ने ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार पॅट कमिन्स याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली. एडन मार्करामकडून ही जबाबदारी ऑसीकडे देण्याच्या SRHच्या निर्णयाचा भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin ) याला धक्का बसला.

आर अश्विन म्हणाला जेव्हा मी ऐकलं की एडन मार्कराम याच्याकडून सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी पॅट कमिन्सकडे सोपवली गेली, तेव्हा मला धक्का बसला. आयपीएल लिलावात सनरायझर्स हैदराबादने २०.५० कोटी रुपये मोजून कमिन्सला आपल्या ताफ्यात घेतले. कोलकाता नाइट रायडर्सने त्याला रिलीज केले होते. आयपीएलच्या इतिहासात २० कोटींहून अधिक बोली लावलेला हा पहिला खेळाडू ठरला होता. 

''सनरायझर्स फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिका २० लीगमध्ये सलग दोन जेतेपदं जिंकली. त्यामुळे मार्करामकडून नेतृत्व काढून घेण्याचा मला धक्का बसला. त्यांनी पॅट कमिन्सला कर्णधार बनवले. ते मार्करामलाच कर्णधार ठेवतील असा माझा एक छोटासा अंदाज होता,''असे अश्विन म्हणाला. त्याने पुढे म्हटले की,''मार्करामचा SA20 मध्ये त्याच्या फ्रँचायझीसाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याला कायम ठेवणे फायद्याचे ठरले असते.''पॅट कमिन्सने केव्हाच ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये नेतृत्व केलेले नाही. पण, कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून त्याने भरपूर यश मिळवले आहे.   

२३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादआर अश्विन