राजस्थान रॉयल्स स्वतःसाठी खड्डा खणला होता, पण शिमरोन हेटमायरने पंजाब किंग्सला झोडले 

राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पाचव्या विजयाची नोंद करून बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 11:15 PM2024-04-13T23:15:52+5:302024-04-13T23:16:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Live : SHIMRON HETMYER HAVE DONE IT FOR RAJSTHAN ROYALS, RR needed 10 of 6 balls and He hits 0,0,6,2, 6 and won the match for RR | राजस्थान रॉयल्स स्वतःसाठी खड्डा खणला होता, पण शिमरोन हेटमायरने पंजाब किंग्सला झोडले 

राजस्थान रॉयल्स स्वतःसाठी खड्डा खणला होता, पण शिमरोन हेटमायरने पंजाब किंग्सला झोडले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Live : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पाचव्या विजयाची नोंद करून बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे. पंजाब किंग्सनवर त्यांनी ७ विकेट्स राखून विजय मिळवला आणि सहा सामन्यांत १० गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. RR ने सहज जिंकता येणारा सामना उगाच रंगतदार बनवला आणि PBKS ला डोकं वर काढण्याची संधी मिळाली. शेवटच्या षटकापर्यंत सामन्यातील चुरस कायम ठेवलेली. अर्शदीपने २०व्या षटकातील दोन चेंडू निर्धाव टाकली, परंतु शिमरोने हेटमायरने तिसरा चेंडू सीमापार पाठवले आणि ३ चेंडूंत ४ धावा असा सामना खेचून आणला. 


पंजाब किंग्सला घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने संघर्ष करण्यास भाग पाडले. आवेश खान ( २-३४) व केशव महाराज ( २-२३) यांनी RR ला मोठे यश मिळवले दिले. जितेश शर्मा ( २९) व लिएम लिव्हिंगस्टोन ( २१) यांनी पंजाबला सावरले. त्यानंतर आशुतोष शर्माने १६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ३१ धावा चोपून संघाला ८ बाद १४७ धावांपर्यंत पोहोचवले. ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल व कुलदीप सेन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. RR ने पदार्पणाची संधी मिळालेल्या तनुष कोटियानने पहिल्या विकेटसाठी यशस्वी जैस्वालसह ५६ धावांची भागीदारी करू नदिली. तनुषने ३१ चेंडूंत ३ चौकारांसह २४ धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने त्याचा त्रिफळा उडवला.  


Impact Player म्हणून आलेला यशस्वी २८ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३९ धावांवर कागिसो रबाडाच्या गोलंदावीर झेलबाद झाला. कागिसोने त्याच्या पुढील षटकात PBKS ला मोठी विकेट मिळवून देताना संजू सॅमसनला ( १८) पायचीत केले. कागिसोने ४ षटकांत १८ धावांत २ विकेट्स घेतल्या. RR चा संघ दडपणात खेळताना दिसला आणि पंजाबला पुनरागमन करण्याची संधी मिळाली होती. सॅम कुरनच्या गोलंदाजीवर रियान पराग याचा लिव्हिंगस्टनने सोडलेला सोपा झेल RR ला फायद्याचा ठरणारा होता. पण, एका चुकीच्या फटक्यामुळे परागचा ( २३) घात झाला आणि अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर कागिसोने चांगला झेल घेतला. 


हर्षल पटेलने RR ला सहावा धक्का दिला, ध्रुव जुरेल ६ धावांवर बाद झाला. RR ला १६ चेंडूंत ३३ धावा करायच्या होत्या. पुढे शिमरॉन हेटमायरने ४ चेंडूंत १३ धावा चोपून सामना १२ चेंडूंत २० धावा असा जवळ आणला. रोव्हमन पॉवेल दुसऱ्या बाजूने उभा होता. त्याने १९व्या षटकात सॅम कुरनच्या पहिल्या दोन चेंडूंवर खणखणीत चौकार लगावले. पण, तिसऱ्या चेंडूवर बाऊन्सरवर कुरनने पॉवेलची ( ११) विकेट मिळवली. त्याच षटकात केशव महाराजची विकेट घेऊन कुरनने पंजाबला सामन्यात कायम राखले. ६ चेंडूंत १० धावा असा सामना रंगतदार होता. अर्शदीप सिंगने २०व्या षटकात प्रयत्न केला, परंतु शिमरोन हेटमारयने RR साठी सामना जिंकला. राजस्थानने ३ विकेट्सने हा सामना जिंकला आणि हेटमायर १० चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २७ धावांवर नाबाद राहिला. 

Web Title: IPL 2024 Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Live : SHIMRON HETMYER HAVE DONE IT FOR RAJSTHAN ROYALS, RR needed 10 of 6 balls and He hits 0,0,6,2, 6 and won the match for RR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.