पंजाबच्या खेळपट्टीवर राजस्थान रॉयल्सचे बल्ले बल्ले! गोलंदाजांनी यजमानांना रडवले 

RR ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी योग्य ठरवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 09:10 PM2024-04-13T21:10:21+5:302024-04-13T21:14:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Live : Ashutosh Sharma ( 31) is making an impact again, PBKS have reached 148/8 | पंजाबच्या खेळपट्टीवर राजस्थान रॉयल्सचे बल्ले बल्ले! गोलंदाजांनी यजमानांना रडवले 

पंजाबच्या खेळपट्टीवर राजस्थान रॉयल्सचे बल्ले बल्ले! गोलंदाजांनी यजमानांना रडवले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Live : पंजाब किंग्सचा इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील परफॉरमन्स अपेक्षेनुसार कमकुवत राहिला. आज घरच्या मैदानावर त्यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांसमोर शेपूट घातले. आशुतोष शर्माने १६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ३१ धावांची फटकेबाजी करून पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. 


RR ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी योग्य ठरवला. अथर्व तायडेने ( १५) दमदार सुरुवात तर केली, परंतु आवेश खानने त्याची विकेट मिळवली. जॉनी बेअरस्टो मैदानावर उभा होता. प्रभसिमरन सिंगला ( १०) युझवेंद्र चहलने माघारी पाठवून पंजाबला ४१ धावांवर दुसरा धक्का दिला. बेअरस्टो 'भरवशाच्या म्हशीला टोणगा' ठरला. केशव महाराजच्या पहिल्याच षटकात बेअरस्टो ( १५) झेलबाद झाला.  महाराजने त्याच्या पुढच्या षटकात पंजाबचा कर्णधार सॅम कुरनला ( ६) माघारी पाठवले. 


पंजाबचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर खेळतोय असे वाटलेच नाही, कारण राजस्थानचे वर्चस्व दिसले. कुलदीपने १३व्या षटकात पंजाबला आणखी एक धक्का देताना शशांक सिंगला ( ९) स्वस्तात माघारी पाठवले. त्याच षटकात लिएम लिव्हिंगस्टनचा झेल संजूने टाकला. जितेश शर्मा पंजाबसाठी मैदानावर उभा राहिला होता, परंतु धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो ( २९) झेलबाद झाला. आवेशने आजच्या सामन्यातील दुसरी विकेट घेतली. लिव्हिंगस्टनवर ( २१) सर्व भीस्त असताना दोन धावांचा मोह त्याला नडला. संजूने चतुराईने त्याला रन आऊट केले.

आशुतोष शर्माने अखेरच्या षटकांत चांगले फटके खेचून पंजाबला ८ बाद १४८ धावांपर्यंत पोहोचवले. 

 

Web Title: IPL 2024 Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Live : Ashutosh Sharma ( 31) is making an impact again, PBKS have reached 148/8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.