Join us  

बाप लेकाची ताटातूट! Shikhar Dhawan ची मुलासाठी भावनिक पोस्ट, चाहते गहिवरले

Shikhar Dhawan post for Son: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शिखर धवन त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमी चर्चेत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 12:55 PM

Open in App

Shikhar Dhawan News: भारतीय संघाचा स्टार खेळाडू शिखर धवन सध्या आयपीएल खेळत आहे. तो पंजाब किंग्जच्या संघाचे नेतृत्व करत आहे. चौकार मारण्यात पटाईत असणारा धवन गब्बर म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. तो अनेकदा त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत असतो. शिखर आणि त्याच्या पत्नीचे नाते फार काळ टिकले नाही आणि त्यांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील एका कौटुंबिक न्यायालयाने धवनचा त्याची विभक्त पत्नी आयशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर केला. त्यानंतर धवन आणि त्याच्या लेकाची ताटातूट झाली. (Shikhar Dhawan Post)

शिखर धवनचा मुलगा जोरावर त्याच्या आईजवळ असतो. धवन अनेकदा आपल्या मुलाच्या आठवणीत भावूक झाल्याचे दिसले आहे. त्याच्या वाढदिवशी शिखरने लाडक्या लेकासाठी एक भावनिक पोस्ट केली होती. आता आयपीएलमध्ये व्यग्र असलेल्या गब्बरने पुन्हा एकदा झोरावरसाठी भावनिक पोस्ट केली असून चाहते देखील गहिवरले आहेत. २०१४ मध्ये शिखर वडील झाला अन् त्याला झोरावरच्या रूपात पुत्र लाभला.

शिखरने आता तो ज्या फ्रँचायझीचा (पंजाब किंग्ज) भाग आहे, त्यांच्या जर्सीतील एक फोटो शेअर केला आहे. पण, या जर्सीवर धवनच्या मुलाचे अर्थात झोरावरचे नाव आहे. फोटो शेअर करताना गब्बरने एक भावनिक कॅप्शन दिले. तो म्हणाला की, तू नेहमीच माझ्यासोबत आहेस... माझ्या बाळा.

दरम्यान, शिखर धवनच्या या पोस्टरवर चाहते कमेंटच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. चाहते देखील भावूक झाल्याचे दिसले. अनेकांनी गब्बरला धीर देण्यासाठी खास चारोळ्या लिहिल्या. तर काहींनी बाप लेकाची ताटातूट होत असल्याची भावना व्यक्त केली.

टॅग्स :शिखर धवनपंजाब किंग्सआयपीएल २०२४