Join us  

LSG चा निम्मा संघ तंबूत! फिल सॉल्टच्या अफलातून झेलमुळे KKR ने पलटली बाजी, Video 

कोलकाता नाईट रायडर्स घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवताना दिसत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 4:48 PM

Open in App

IPL 2024 : Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Marathi - कोलकाता नाईट रायडर्स घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांना KKR च्या गोलंदाजांसमोर संघर्ष करावा लागला. रमणदीप सिंगनंतर यष्टिरक्षक फिल सॉल्टच्या अफलातून झेलने सामन्यात रंगत आणली. LSG चा निम्मा संघ १११ धावांत तंबूत परतला.  

KKR ने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी श्रेयस अय्यरच्या निर्णयाला साथ दिली. दुसऱ्याच षटकात क्विंटन डी कॉक ( १०) याला वैभव अरोराने बाद केले. फलंदाजीत बढती मिळूनही दीपक हुडा ( ८) फेल गेला आणि रमणदीप सिंगने बॅकवर्ड पॉईंटवर अफलातून झेल घेतला. लोकेश राहुल व आयुष बदोनी यांना KKR च्या गोलंदाजांनी दडपणात ठेवले होते. कर्णधार लोकेश राहुल चांगला खेळत होता आणि ११व्या षटकात आंद्रे रसेलचे स्वागत त्याने षटकाराने केले. पण, दुसऱ्या चेंडूवर मारलेला पुल शॉट फसला आणि लोकेश २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर झेलबाद झाला.

 या सामन्यात लोकेश राहुलने एक वेगळा विक्रम नावावर केला. ट्वेंटी-२०त ३०० षटकार खेचणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला. रोहित शर्मा ( ४९७) टॉपर आहे, त्यानतर विराट कोहली ( ३८३), सुरेश रैना ( ३३२), महेंद्रसिंग धोनी ( ३२८) यांचा क्रमांक येतो.  दोन चौकारांनी खाते उघडणारा मार्कस स्टॉयनिस ( १०) वरुण चक्रवर्थीच्या गुगलीवर विचित्र पद्धतीने बाद झाला. स्टॉयनिसच्या बॅटला लागून चेंडू पॅडवर आदळला आणि यष्टिरक्षक फिल सॉल्टने चतुराईने झेल टिपला. 

टॅग्स :आयपीएल २०२४लखनौ सुपर जायंट्सकोलकाता नाईट रायडर्स