लखनौच्या भेदक माऱ्यासमोर रवींद्र जडेजा उभा राहिला; MS Dhoni ची 360° फटकेबाजी

लखनौ सुपर जायंट्सनी घरच्या मैदानावर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीने चेन्नई सुपर किंग्सवर वर्चस्व राखले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 09:12 PM2024-04-19T21:12:41+5:302024-04-19T21:15:27+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : 42-year-old MS Dhoni smashed 28*(9) with 2 sixes and 3 fours, Ravindra Jadeja unbeaten 57 runs, CSK set 177 runs target to LSG | लखनौच्या भेदक माऱ्यासमोर रवींद्र जडेजा उभा राहिला; MS Dhoni ची 360° फटकेबाजी

लखनौच्या भेदक माऱ्यासमोर रवींद्र जडेजा उभा राहिला; MS Dhoni ची 360° फटकेबाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : लखनौ सुपर जायंट्सनी घरच्या मैदानावर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीने चेन्नई सुपर किंग्सवर वर्चस्व राखले. कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर व मार्कस स्टॉयनिस यांनी चांगला मारा करून CSK च्या धावा आटवल्या होत्या. रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाने CSK ला सामन्यात ठेवलेले, त्यात मोईन अलीने १८व्या षटकांत ६ षटकार खेचून धावा वाढवल्या. महेंद्रसिंग धोनीने पुन्हा माहोल तयार केले आणि CSK ला सन्मानजनक धावापर्यंत पोहोचवले. 


ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स आज इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा सामना करणार आहे.  लखनौमध्ये MS Dhoni ची क्रेझ पाहायला मिळाली.. CSK टीम बसभवती पिवळी जर्सी घातलेल्या चाहत्यांचा घोळका होता. CSK च्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत ७.०३च्या सरासरीने धावा दिल्या आहेत आणि आयपीएल २०२४ मधील ही अन्य संघाच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. मथीशा पथिराणाने ३ ट्वेंटी-२० सामन्यांत निकोलस पूरनला तीनवेळा बाद केले आहे. चेन्नईचा संघ यंदाच्या पर्वात सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे आणि त्यांची झेल घेण्याची टक्केवारी ७९.४१ इतके आहेत, जी मुंबई इंडियन्सनंतरची सर्वोत्तम आहे. त्यांनी ३४ पैकी फक्त ७ झेल सोडले आहेत. LSG ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 


आज पुन्हा अजिंक्य रहाणेला CSK ने सलामीला पाठवले. रचिन रवींद्र दुसऱ्या षटकात मोहसिन खानच्या चेंडूवर गोल्डन डक ठरला. त्याचा त्रिफळा उडाला. अजिंक्य व कर्णधार ऋतुराज यांची २९ ( १९ चेंडू) धावांची भागीदारी यश ठाकूरने तोडली, ऋतुराग १७ धावांवर झेलबाद झाला. CSK ला पॉवर प्लेमध्ये २ बाद ५१ धावा करता आल्या. अजिंक्य २४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३६ धावांवर कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. मार्कस स्टॉयनिसने त्याच्या पहिल्या व सामन्यातील १२व्या षटकात शिवम दुबेला ( ३) बाद करून LSG ला मोठे यश मिळवून दिले. समीर रिझवी ( १) कृणालच्या गोलंदाजीवर बाद झाल्यावर MS Dhoni येईल असे वाटले होते. पण, मोईन अली आला अन् रवींद्र जडेजा दुसऱ्या बाजूने खिंड लढवत होता. 

मोईन अलीने २० चेंडूंत ३ षटकारासह ३० धावांची दमदार खेळी केली. महेंद्रसिंग धोनीने पुन्हा वादळ आणलं आणि पहिल्या ४ चेंडूंत ६,४ने १२ धावा चोपल्या.  धोनीने या सामन्यात ९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २८ धावांवर नाबाद राहिला. जडेजानेही ५७ धावांची नाबाद खेळी करून चेन्नईला ६ बाद १७६ धावांपर्यंत पोहोचवले. 

Web Title: IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : 42-year-old MS Dhoni smashed 28*(9) with 2 sixes and 3 fours, Ravindra Jadeja unbeaten 57 runs, CSK set 177 runs target to LSG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.