IPL 2024 LSG vs DC: भारतीय खेळाडू चमकले! कुलदीप-आयुष 'लढले', दिल्लीसमोर १६८ चे लक्ष्य

IPL 2024 LSG vs DC Live Match: आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 09:27 PM2024-04-12T21:27:18+5:302024-04-12T21:27:29+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 LSG vs DC Live Match Updates Lucknow Super Giants set Delhi Capitals a target of 168 to win, Ayush Badoni scored 55 | IPL 2024 LSG vs DC: भारतीय खेळाडू चमकले! कुलदीप-आयुष 'लढले', दिल्लीसमोर १६८ चे लक्ष्य

IPL 2024 LSG vs DC: भारतीय खेळाडू चमकले! कुलदीप-आयुष 'लढले', दिल्लीसमोर १६८ चे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 LSG vs DC Live Match Updates | लखनौ: आपला विजयरथ कायम ठेवण्यासाठी लखनौ सुपर जायंट्चा संघ मैदानात आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील २६व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आहेत. नाणेफेक जिंकून यजमान संघाचा कर्णधार लोकेश राहुलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (IPL Videos) लखनौचा विजयरथ रोखण्याचे मोठे आव्हान रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीसमोर आहे. यजमान संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवने कमाल करत लखनौच्या आघाडीच्या फलंदाजाचा करेक्ट कार्यक्रम केला. (IPL 2024 News) 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमान लखनौला क्विंटन डीकॉकच्या रूपात सुरुवातीलाच मोठा झटका बसला. मग कर्णधार लोकेश राहुलने डाव सावरला. पण, कुलदीप यादव लखनौसाठी काळ ठरला. त्याने ३ बळी घेत कमाल केली. मात्र, अखेरच्या काही षटकांमध्ये आयुष बदोनीने स्फोटक खेळी करत सन्मानजनक धावसंख्या उभारली.

लखनौकडून डीकॉकने (१९), लोकेश राहुल (३९), देवदत्त पडिक्कल (३), मार्कस स्टॉयनिस (८), निकोलस पूरन (०), दीपक हुड्डा (इम्पॅक्ट प्लेअर (१०), कृणाल पांड्या (३), अर्शद खान (नाबाद २० धावा) आणि आयुष बदोनीने नाबाद ५५ धावा केल्या. अखेर लखनौने निर्धारित २० षटकांत ७ बाद १६७ धावा केल्या. बदोनीने १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३५ चेंडूत नाबाद ५५ धावा कुटल्या. दिल्लीकडून कुलदीप यादवने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर खलील अहमद (२) आणि इशांत शर्मा आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी १-१ बळी घेता आला. 

खनौचा संघ -
लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक, देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर.

दिल्लीचा संघ - 
रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, जेक फ्रेजर-मॅकगर्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद. 

Web Title: IPL 2024 LSG vs DC Live Match Updates Lucknow Super Giants set Delhi Capitals a target of 168 to win, Ayush Badoni scored 55

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.