Join us  

IPL 2024 LSG vs DC: WHAT A BALL मॅजिकल कुलदीप यादव; निकोलस पूरनलाही विश्वास बसेना!

IPL 2024 LSG vs DC Live Match: आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 8:35 PM

Open in App

IPL 2024 LSG vs DC Live Match Updates | लखनौ: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील २६व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आहेत. नाणेफेक जिंकून यजमान संघाचा कर्णधार लोकेश राहुलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (IPL Videos) लखनौचा विजयरथ रोखण्याचे मोठे आव्हान रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीसमोर आहे. यजमान संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवने कमाल करत लखनौच्या आघाडीच्या फलंदाजाचा करेक्ट कार्यक्रम केला. (IPL 2024 News) 

कुलदीप यादवने मार्कस स्टॉयनिस (८), निकोलस पूरन (०) आणि लोकेश राहुल (३९) यांना बाहेरचा रस्ता दाखवला. कुलदीपने एकाच षटकात स्टॉयनिस आणि पूरन यांना बाद करून यजमानांना मोठे धक्के दिले. कुलदीपने अप्रतिम चेंडू टाकून निकोलस पूरनला आपल्या जाळ्यात फसवले. पूरनला खाते देखील उघडला आले नाही अन् त्याचा त्रिफळा उडाला. त्याच्या पुढच्या षटकात कुलदीपने प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार लोकेश राहुलला बाद करण्यात यश मिळवले. राहुलने १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने २२ चेंडूत ३९ धावा केल्या.

लखनौचा संघ -लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक, देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर.

दिल्लीचा संघ - रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, जेक फ्रेजर-मॅकगर्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद. 

टॅग्स :कुलदीप यादवआयपीएल २०२४दिल्ली कॅपिटल्सलखनौ सुपर जायंट्सलोकेश राहुल