IPL 2024: मम्मी MS Dhoni ची चाहती अन् पप्पा SRHचे; चिमुरडी सापडली धर्मसंकटात

IPL 2024 SRH vs CSK Match Live: सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 08:11 PM2024-04-05T20:11:39+5:302024-04-05T20:11:48+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Live Score Update SRH vs CSK A young fan spotted the poster which is going viral on social media | IPL 2024: मम्मी MS Dhoni ची चाहती अन् पप्पा SRHचे; चिमुरडी सापडली धर्मसंकटात

IPL 2024: मम्मी MS Dhoni ची चाहती अन् पप्पा SRHचे; चिमुरडी सापडली धर्मसंकटात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 SRH vs CSK Match Live Updates In Marathi । हैदराबाद: सध्या आयपीएलच्या सतराव्या पर्वाचा थरार रंगला आहे. आयपीएलच्या सामन्यांदरम्यान चाहते भन्नाट पोस्टर झळकावून सर्वांचे लक्ष वेधतात. या सोशल मीडियाच्या जगात कोण कधी प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. सध्या एका चिमुकलीने झळकवलेले पोस्टर चांगलेच व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती तिच्या आई-वडिलांच्या आवडत्या संघांविषयी भाष्य करत आहे.

चिमुकलीने झळकवलेल्या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, पप्पा सनरायझर्स हैदराबादला सपोर्ट करतात... मम्मी महेंद्रसिंग धोनीची फॅन आहे... मग मी आईस्क्रीमसाठी कोणाला सपोर्ट करायला हवा.  आयपीएलच्या सतराव्या हंगामातील अठरावा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होत आहे. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी हैदराबादने संघात दोन बदल केले आहेत, तर सीएसकेने तीन बदल केले. हैदराबादच्या संघात मयंक अग्रवालच्या जागी नितीश रेड्डीला स्थान मिळाले आहे, तर नटराजनचे संघात पुनरागमन झाले आहे. या सामन्यासाठी पाहुण्या चेन्नईने मोईन अली, महेश तीक्ष्णा आणि मुकेश चौधरी यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.

SRH चा संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय, टी नटराजन. 

CSK चा संघ -
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डेरिल मिचेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा. 

Web Title: IPL 2024 Live Score Update SRH vs CSK A young fan spotted the poster which is going viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.