Join us  

जॉनी जॉनी... १६ चेंडूंत ८० धावा! बेअरस्टोचे ईडन गार्डवर वादळी शतक; अश्विनची “Save the bowlers” पोस्ट

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये २०२४ गोलंदाजांची काहीच किम्मत राहिलेली नाही, असे आजही दिसले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:46 PM

Open in App

IPL 2024, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये २०२४ गोलंदाजांची काहीच किम्मत राहिलेली नाही, असे आजही दिसले. कोलकाता नाईट रायडर्सच्या २६१ धावांच्या प्रत्युत्तरात पंजाब किंग्सच्या सलामीच्या जोडीने पहिल्या ६ षटकांत ९४ धावा कुटल्या. प्रभसिमरन सिंग अर्धशतक झळकावून दुर्दैवीरित्या रन आऊट झाल्यानंतरही ही फटकेबाजी थांबली नाही. जॉनी बेअरस्टो मनगटाचा जोर दाखवून KKR च्या गोलंदाजांना बेक्कार चोपत राहिला. भारताचा महान फिरकीपटू आर अश्विन याने गोलंदाजांनावर दया करण्याचं ट्विट केलं... 

ईडन गार्डनवर ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली केली. KKR ने ६ बाद २६१ धावांचा डोंगर उभा केला. सुनील नरीन व फिल सॉल्ट यांच्या दे दना दन फटकेबाजीने मैदान दणाणून सोडले. यांनी घातलेल्या मजबूत पायावर अन्य फलंदाजांनीही धावांचे इमले रचले. PBKSच्या गोलंदाजांची अवस्था फार वाईट झाली. नरीनने ३२ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ७१ धावा चोपल्या, तर सॉल्टने ३७ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ७५ धावा केल्या. या दोघांनी ईडन गार्डनवर आयपीएल इतिहासात सर्वाधिक १३८ धावांच्या भागीदारीचा विक्रम नावावर केला. आंद्रे रसेल ( २४), श्रेयस अय्यर ( २८) व वेंकटेश अय्यर ( ३९*) यांनीही चांगले फटके खेचून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

प्रभसिमरन सिंगने १८ चेंडूंत फिफ्टी पूर्ण करून पंजाबला धडाकेबाज सुरूवात करून दिली. जॉनी बेअरस्टोसह त्याने पहिल्या विकेटसाठी ६ षटकांत ९३ धावा उभ्या केल्या. बेअरस्टोने सहाव्या षटकात २४ धावा कुटल्या, परंतु शेवटच्या चेंडूवर प्रभसिमरन १ धाव घेण्याच्या प्रयत्नात सुनील नरीच्या डायरेक्ट हिटवर रन आऊट झाला. प्रभसिमरनने २० चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ५४ धावा केल्या. पंजाबने ७.२ षटकांत तिहेरी धावा फलकावर चढवल्या. बेअरस्टोने २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून फॉर्म पून्हा मिळवला. रायली रूसो याच्यासोबत बेअरस्टोने PBKS ला १० षटकांत १ बाद १३२ धावांपर्यंत पोहोचवले. २०१४ मध्ये त्यांनी SRH विरुद्ध पहिल्या १० षटकांत ३ बाद १३१ धावा केल्या होत्या आणि आज तो विक्रम मोडला.

बेअरस्टो बॉटम हँडचा चांगला वापर करून चेंडू मैदानाच्या चहू बाजूंना सहजतेने टोलवत होता आणि रूसोलाही सूर गवसलेला दिसला. या दोघांनी १२ षटकांत १७३ धावा उभ्या केल्या. नरीनने KKR ला दुसरी विकेट मिळवून दिली. रूसो १६ चेंडूंत २६ धावांवर बाद झाला आणि बेअरस्टोसह त्याची ३९ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी तुटली.  PBKS ने १५ षटकांत २ बाद २०१ धावा उभ्या केल्या आणि शेवटच्या ३० चेंडूंत ६१ धावा त्यांना करायच्या होत्या. नरीनने त्याच्या ४ षटकांत फक्त २४ धावा देत १ विकेट घेतली.  बेअरस्टोने ४५ चेंडूंत आयपीएलमधील दुसरे शतक पूर्ण केले. 

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सपंजाब किंग्स