Sai Sudharsan चमकला, ऋतुराजचा विक्रम मोडून अव्वल झाला; संकटात तेंडुलकरचा पराक्रम

शुबमन गिल आणि राहुल तेवाटीया यांनी दमदार खेळ करून गुजरात टायटन्सला १९९ धावांपर्यंत पोहोचवले. पण, या खेळीत साई सुदर्शनचे ( Sai Sudharsan ) मोलाचे योगदान ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 10:16 PM2024-04-04T22:16:36+5:302024-04-04T22:16:49+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - Sai Sudharsan score most IPL runs after 17 Inngs (Indians), break Ruturaj Gaikwad record, He has opportunity to break fastest Indian to reach 1000 IPL Runs record | Sai Sudharsan चमकला, ऋतुराजचा विक्रम मोडून अव्वल झाला; संकटात तेंडुलकरचा पराक्रम

Sai Sudharsan चमकला, ऋतुराजचा विक्रम मोडून अव्वल झाला; संकटात तेंडुलकरचा पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - शुबमन गिल आणि राहुल तेवाटीया यांनी दमदार खेळ करून गुजरात टायटन्सला १९९ धावांपर्यंत पोहोचवले. पण, या खेळीत साई सुदर्शनचे ( Sai Sudharsan ) मोलाचे योगदान ठरले. त्याने १९ चेंडूंत ३३ धावा चोपून पंजाब किंग्सने सामन्यावर मिळवलेली पकड सैल केली आणि पुढे शुबमनचा मार्ग मोकळा झाला. साईने आजच्या खेळीने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याचा मोठा विक्रम मोडला. शिवाय, त्याला आता महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडण्याची संधी निर्माण झाली आहे. 

गिलने जिंकलं दिल! शुबमनने मोडला Mr. IPL, रहाणे, विराट, रोहित यांचा मोठा विक्रम 

कर्णधार शुबमन गिलने ( Shubman Gill ) पुन्हा एकदा दमदार खेळ करून गुजरात टायटन्सला मोठ्या धावसंख्या उभारून दिल्या. केन विलियम्सनने ( २६)  चांगला खेळ केला, परंतु त्याचा धावांचा वेग संथ राहिला. पण, साई सुदर्शनने ही उणीव भरून काढताना १९ चेंडूंत ६ चौकारांसह ३३ धावा चोपल्या. राहुल तेवाटीयाने अखेरच्या षटकांत चांगले फेटके खेचले. GT कडून १५०० हून अधिक धावा करणारा गिल पहिला फलंदाज ठरला.  विजय शंकर ( ८) पुन्हा अपयशी ठरला आणि रबाडाने सामन्यातील दुसरी विकेट घेतली. गुजरातने ४ बाद १९९ धावा उभ्या केल्या. राहुलने ८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद २३ धावा केल्या, तर शुबमन ४८ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारासह ८९ धावा केल्या. 


आयपीएलमध्ये १७ इनिंग्जनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम आता साई सुदर्शनच्या ( ६६७) नावावर नोंदवला गेला आहे. त्याने ऋतुराज गायकवाड ( ६११) याचा विक्रम मोडला. गौतम गंभीर ( ५६५), तिलक वर्मा ( ५४०), रोहित शर्मा ( ५३०), देवदत्त पडिक्कल ( ५०९) व राहुल द्रविड ( ५०५) हेही आज मागे पडले. आता साई सुदर्शनला आयपीएलमध्ये सर्वात वेगाने १००० धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम मोडण्याची संधी आहे. सचिन तेंडुलकर व ऋतुराज यांनी ३१ इनिंग्जमध्ये १००० धावा केल्या होत्या. साईने पुढील १३ इनिंग्जमध्ये ३३३ धावा केल्यास हा विक्रमही त्याच्या नावावर नोंदवला जाईल.  

Web Title: IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - Sai Sudharsan score most IPL runs after 17 Inngs (Indians), break Ruturaj Gaikwad record, He has opportunity to break fastest Indian to reach 1000 IPL Runs record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.