Join us  

गुजरात टायटन्सची 'Power' गुल! सुमित कुमारचा भन्नाट रन आऊट, रिषभ पंतचा अफलातून झेल

रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर आजच्या सामन्यात खेळणार नाही आणि त्याच्याजागी सुमित कुमार याला संधी दिली गेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 8:08 PM

Open in App

IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live :  गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होत आहे. रिषभ पंत विरुद्ध राशिद खान अशी टक्कर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. गुजरातचा संघ विजयी लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल, तर दुसरीकडे दिल्ली देखील विजय मिळवून गुणतालिकेत झेप घेण्यासाठी सज्ज आहेत. दिल्लीसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यांना ६ मध्ये फक्त दोन सामने जिंकता आले आहेत, तेच GT ६ सामन्यांत ३ विजयांसह तालिकेत सहाव्या क्रमांकावर आहेत. 

  • आयपीएलमध्ये १५० बळी पूर्ण करण्यासाठी राशिद खानला ५ विकेट्सची गरज आहे
  • शुबमन गिलला आयपीएलमध्ये ३०० चौकार पूर्ण करण्यासाठी ८ चौकार खेचावे लागतील
  • विजय शंकरला आयपीएलमध्ये षटकारांची फिफ्टी साजरी करण्यासाठी ५ उत्तुंग फटके खेचावे लागतील
  • खलिल अहमद आज आयपीएलमधील त्याचा पन्नासावा सामना खेळतोय. 

 

रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर आजच्या सामन्यात खेळणार नाही आणि त्याच्याजागी सुमित कुमार याला संधी दिली गेली आहे. गुजरातच्या संघात तीन बदल आहेत आणि वृद्धीमान सहा, डेव्हिड मिलर व संदीप  वॉरियर ( पदार्पण) खेळणार आहेत. शुबमन गिलने ( ८) दोन चौकार खेचून आश्वासक चित्र रंगवले, परंतु इशांत शर्माने दुसऱ्याच षटकात त्याला चतुराईने बाद केले. मुकेश कुमारने त्याच्या पहिल्या व डावातील चौथ्या षटकात वृद्धीमान सहाचा ( २) त्रिफळा उडवला. पुढील षटकात एक धाव घेण्याच्या गडबडीत साई सुदर्शनने ( १२) विकेट फेकली, सुमित कुमारने अचूक थ्रो करून GT च्या फलंदाजाला रन आऊट केले. 

इशांत शर्माने पाचव्या षटकात गुजरातचा मेन फलंदाज डेव्हिड मिलर ( २) याला माघारी पाठवले आणि यष्टींमागे रिषभ पंतने अप्रतिम झेल घेतला. पहिल्या पॉवर प्लेमध्ये गुजरताने ३० धावांत ४ विकेट्स गमावल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२४दिल्ली कॅपिटल्सगुजरात टायटन्सरिषभ पंत