Join us  

IPL 2024: गुजरात टायटन्सला मोठा झटका! अपघातामुळे ३.६० कोटींचा खेळाडू स्पर्धेबाहेर

robin minz ipl team: आयपीएल २०२४ साठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 8:14 PM

Open in App

आयपीएल २०२४ साठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे. २२ मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. आयपीएलला सुरूवात होण्याआधीच गुजरातच्या संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कर्णधार हार्दिक पांड्या दुसऱ्या संघात गेल्यानंतर आणि मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर पडल्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. अशातच गुजरातचा आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलच्या सतराव्या हंगामातून बाहेर झाला आहे.

आयपीएल २०२४ च्या लिलावात ३.६० कोटी रुपयांना विकला गेलेला रॉबिन मिंज अलीकडेच रस्ते अपघातात जखमी झाला होता. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या फ्रँचायझींसोबत चुरस झाल्यानंतर अखेर त्याला गुजरातने खरेदी केले. मिंज स्फोटक खेळीसाठी ओळखला जातो. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये होती आणि तो ३.६० कोटी रुपयांना विकला गेला. पण दुखापतीमुळे तो आगामी हंगामाला मुकणार आहे. गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराने सांगितले की, रॉबिन मिंज दुखापतीतून अद्याप सावरला नाही, त्यामुळे तो आगामी हंगामासाठी उपलब्ध नसेल. त्याची कमी नक्कीच आम्हाला जाणवेल.

दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ची तारीख जाहीर झाली आहे. यंदा आयपीएलनंतर लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे, शिवाय लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल नेमकी कुठे खेळवायची हाही प्रश्न होता. पण, याचे उत्तर मिळाले आहे. आयपीएल २०२४ ला २२ मार्चपासून सुरू होणार आहे आणि पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांनंतर पुढील वेळापत्रक जाहीर केले जाईल. 

आयपीएलचे पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक

  1. २२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  2. २३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
  3. २३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
  4. २४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
  5. २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  6. २५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  7. २६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  8. २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  9. २८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
  10. २९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  11. ३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
  12. ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
  13. ३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  14. १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
  15. २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  16. ३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  17. ४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  18. ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
  19. ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
  20. ७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
टॅग्स :आयपीएल २०२४गुजरात टायटन्सआशिष नेहरा