Join us  

काव्या मारनच्या निर्णयावर इरफान पठाण नाखूश; म्हणाला, नेतृत्व सोडाच गोलंदाज म्हणून...

माजी भारतीय क्रिकेटपटूने सांगितले की एडन मार्करामने सनरायझर्स हैदराबाद (SRH) फ्रँचायझीच्या  सनरायझर्स इस्टर्न केपला २०२३ आणि २०२४ मध्ये सलग SA20 विजेतेपद मिळवून दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 12:53 PM

Open in App

IPL 2024 : सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या तोंडावर कर्णधार बदलला. एडन मार्करामकडून ही जबाबदारी काढून घेऊन त्यांनी आयपीएल २०२४ साठी पॅट कमिन्सकडे नेतृत्व सोपवले. पण, माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू आणि समालोचक इरफान पठाणने  सनरायझर्स हैदराबाद ( SRH ) वर टीका केली आहे. मार्करामला हटवून कमिन्सकडे कर्णधारपद सोपवण्याच्या निर्णयामुळे उद्भवलेल्या समस्यांबद्दल पठाणने चिंता व्यक्त केली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटूने सांगितले की एडन मार्करामने सनरायझर्स हैदराबाद (SRH) फ्रँचायझीच्या  सनरायझर्स इस्टर्न केपला २०२३ आणि २०२४ मध्ये सलग SA20 विजेतेपद मिळवून दिले आहे.

भारताच्या माजी वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूने असेही म्हटले की, पॅट कमिन्सने अॅशेस राखली आणि नंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आणि  वन डे वर्ल्ड कप २०२३ जिंकला, परंतु ट्वेंटी-२० क्रिकेटमधील त्याच्या अनुभवाचा अभाव सनरायझर्स हैदराबादसाठी चिंताजनक ठरू शकतो. जेव्हा तुम्ही कर्णधारपदाबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला कमिन्सच्या नावापेक्षा दुसऱ्या नावाचा विचार करण्याची इच्छा नसते. कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने नुकताच वर्ल्ड कप जिंकला; गेल्या दीड वर्षात त्याने खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. पण जेव्हा ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा विचार केला जातो तेव्हा त्याचं यश असं काहीही नाही.

मीनी ऑक्शनमध्ये फ्रँचायझीने कमिन्सला २०.५० कोटीत आपल्या संघात घेतले होते. आयपीएलमध्ये ४२ सामन्यांत ४५ विकेट्स घेतल्या आहेत.  इरफान पठाण पुढे म्हणाला, “त्याची ट्वेंटी-२० क्रिकेटमधील कामगिरी काही खास नाही आणि त्याची आयपीएलची आकडेवारीही चांगली नाही. SRH काय विचार करत आहे? एवढे मोठे पाऊल त्यांनी उचलले आहे. कमिन्सला कर्णधार बनवलं, तर मार्करामचं काय होईल? तुम्ही त्याला फक्त एक वर्षच कर्णधारपद दिलं, मग त्याची साथ द्यायची नाही का? हा एक मोठा प्रश्न आहे. नेतृत्व विसरा, कमिन्स गोलंदाज म्हणून कशी कामगिरी करेल? हे पाहणे उत्सुकतेचे असेल."

टॅग्स :आयपीएल २०२३सनरायझर्स हैदराबादइरफान पठाण