भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठरणार आयपीएल २०२४ चे वेळापत्रक; जाणून घ्या कसं

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ( IPL 2024) च्या तयारीला वेग पकडू लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 03:04 PM2023-12-01T15:04:00+5:302023-12-01T15:05:53+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 fate is intricately tied to the decisions of the Election Commission of India (ECI), as the country gears up for general elections next year | भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठरणार आयपीएल २०२४ चे वेळापत्रक; जाणून घ्या कसं

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठरणार आयपीएल २०२४ चे वेळापत्रक; जाणून घ्या कसं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ( IPL 2024) च्या तयारीला वेग पकडू लागला आहे. आयपीएल रिटेन्सन लिस्ट जाहीर करण्याची डेड लाईन संपली आहे आणि आता १९ डिसेंबरला होणाऱ्या लिलावाची उत्सुकता आहे. पण, एवढं सगळं करून आयपीएल २०२४ भारतातच होईल का, हा अनेकांना प्रश्न आहे. कारण २०२४ मध्ये भारतात लोकसभेची निवडणुक होणार आहे आणि त्यामुळे आयपीएल २०२४ कदाचित भारताबाहेर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण, हाती आलेल्या अपडेट्सनुसार भारतीय निवडणुक आयोगाच्या ( ECI ) निर्णयावर आयपीएल २०२४च्या तारखा ठरणार आहेत.  


इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL 2024) च्या तारखा, त्याचे ठिकाण आणि वेळापत्रका हे सर्व ECI च्या आगामी घोषणांवर अवलंबून आहे. PTIने दिलेल्या वृत्तानुसार, IPL गव्हर्निंग काऊन्सिल भारतीय निवडणूक आयोगाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखांच्या महत्त्वपूर्ण घोषणेची वाट पाहत आहे. आयपीएल संपूर्णपणे भारता होईल किंवा अन्य ठिकाणी करायचे याचा निर्णय हा आयोगाच्या घोषणेवर अवलंबून आहे.  

यापूर्वीही आयपीएल  झाली होती भारताबाहेर
सार्वत्रिक निवडणुकांमुळे २००९ मध्ये आयपीएल भारताबाहेर खेळवण्यात आळी होती. लीगची दुसरी आवृत्ती दक्षिण आफ्रिकेत झाली होती. त्यानंतर २०१४ साली आयपीएलचा सुरुवातीचा टप्पा युएईत झाला होता आणि त्यानंतर भारतात. तथापि, २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुका असूनही भारतात आयपीएल झाली होती. २०२४ मध्येही असेच काहीसे होईल. पण, त्यापूर्वी आयोगाच्या तारखांच्या घोषणेची वाट पाहण्यापलीकडे आयपीएल आयोजकांकडे काहीच नाही. 


निवडणुका ही एकच समस्या आयपीएल २०२४ समोर नाही. आयपीएलच्या आधी इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका होणार आहे आणि त्यामुळे २४ मार्च ते २६ मे या कालावधीत ही लीग खेळवली जाऊ शकते. कारण, आयपीएल २०२४ नंतर लगेचच वेस्ट इंडिज व अमेरिका येथे ३ ते ३० जून या कालावधीत ट्वेंटी-२० वर्लड कप होणार आहे.   

Read in English

Web Title: IPL 2024 fate is intricately tied to the decisions of the Election Commission of India (ECI), as the country gears up for general elections next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.