Join us  

१७ चेंडूंत ८० धावा! Travis Head ने बेक्कार चोपला ना भावा...; SRH करू शकतात ३४८ धावा

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी का घेतली, ही खंत रिषभ पंतला नक्की झाली असावी.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 8:20 PM

Open in App

IPL 2024, Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Live Marathi : नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी का घेतली, ही खंत रिषभ पंतला नक्की झाली असावी. ट्रॅव्हिस हेड ( Travis Head) व अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma) यांनी DCच्या गोलंदाजांना निर्दयीपणे धुतले. या दोघांनी २.४ षटकांत पन्नास धावा, ४.५ षटकांत शंभर धावा SRH च्या फलकावर चढवल्या. आयपीएल इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने ५ षटकांत शंभर धावा चोपल्या. पहिल्या पॉवर प्लेमध्ये SRH ने १२५ धावा कुटल्या आणि आयपीएल इतिहासातील या सर्वोच्च धावा आहेत. 

१३ चौकार, ११ षटकार! SRHकडून ना दया, ना माया; T20तील सर्वात 'Power' फुल धुलाई

हैदराबादच्या फलंदाजांना रोखणं हे भल्याभल्यांना अवघड होऊन बसलं आहे. तरीही दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा घेतलेला धाडसी निर्णय अंगाशी आला. दुसऱ्या चेंडूपासून सुरू झालेली षटकाराची आतषबाजी ७व्या षटकापर्यंत अविरत सुरू राहिली. हेडने १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना आयपीएलमधील वेगवान फिफ्टीत सुरेश रैनाशी बरोबरी केली. एनरिच नॉर्खियाने टाकलेल्या तिसऱ्या षटका हेडने ४,४,०,४,४,६ असे फटके खेचले. अभिषेकही खणखणीत फटकेबाजी करत होता.   सातव्या षटकात दिल्लीला हे वादळ रोखण्यात यश मिळाले. अभिषेक १२ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह ४६ धावांवर झेलबाद झाला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने अप्रतिम झेल घेतला आणि १३१ धावांची भागीदारी तुटली. त्याच षटकात कुलदीपने SRH ला दुसरा धक्का देताना एडन मार्करम ( १) याला बाद केले. युवराज सिंगचा ( १२) ट्वेंटी-२०तील वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून अभिषेक चुकला. कुलदीपने आजच्या सामन्यातील तिसरी विकेट घेताना दिल्लीला दिलासा मिळेल असा फलंदाज माघारी पाठवला. हेड ३२ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ८९ धावांवर बाद झाला. 

हैदराबाद ८.४ षटकांत २ बाद १५१ धावा उभ्या केल्या आणि याच गतीने ते खेळल्यास ते २० षटकांत ३४८ धावांपर्यंत मजल मारतील. 

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्सकुलदीप यादव