Join us  

१३ चौकार, ११ षटकार! SRHकडून ना दया, ना माया; T20तील सर्वात 'Power' फुल धुलाई

ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 8:01 PM

Open in App

IPL 2024, Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Live Marathi : ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई केली. २.४ षटकांत पन्नास धावा, ४.५ षटकांत शंभर धावा या जोडीने सनरायझर्स हैदराबादसाठी फलकावर चढवल्या. आयपीएल इतिहासात प्रथमच एखाद्या संघायने ५ षटकांत शंभर धावा चोपल्या. पहिल्या पॉवर प्लेमध्ये SRH ने १२५ धावा कुटल्या आणि आयपीएल इतिहासातील या सर्वोच्च धावा आहेत. 

दिल्लीने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीला बोलावले.  सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना रोखणं हे भल्याभल्यांना अवघड होऊन बसलं आहे. तरीही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा धाडसी निर्णय दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने घेतला अन् तो त्याला महागात पडला. ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) दुसऱ्या चेंडूपासून फटकेबाजी सुरू केली आणि १६ चेंडूंत हाफ सेन्च्युरी ठोकली. एनरिच नॉर्खियाने टाकलेल्या तिसऱ्या षटका हेडने ४,४,०,४,४,६ असे फटके खेचले. हैदराबादने २.४ षटकांत पन्नास धावा पूर्ण केल्या. 

आयपीएलमधील वेगवान फिफ्टी13b - यशस्वी जैस्वाल v KKR (2023)14b - लोकेश राहुल v DC (2018) 14b - पॅट कमिन्स v MI (2022)15b - युसूफ पठाण  v SRH (2014) 15b - सुनील नरीन  v RCB (2017) 15b - निकोलस पूरन  v RCB (2023)16b - सुरेश रैना v KXIP (2014) 16b - इशान किशन v SRH (2021) 16b - अभिषेक शर्मा v MI (2024)16b - ट्रॅव्हिस हेड v DC, 2024* अभिषेकनेही १० चेंडूंत ४० धावा चोपून हैदराबादला ५ षटकांत १०३ धावांपर्यंत पोहोचवले. हा आयपीएल इतिहासातील विक्रम आहे. हैदराबादने पॉवर प्लेमध्ये १२५ धावा चोपल्या ज्या ट्वेंटी-२० क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक आहेत. 

 

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्स