कोलकाता नाईट रायडर्सचा १०६ धावांनी विजय, गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये बुधवारी दणदणीत विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 11:23 PM2024-04-03T23:23:04+5:302024-04-03T23:23:17+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update :  KKR NOW BECOMES TABLE TOPPERS, beat DC by 106 runs | कोलकाता नाईट रायडर्सचा १०६ धावांनी विजय, गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान

कोलकाता नाईट रायडर्सचा १०६ धावांनी विजय, गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये बुधवारी दणदणीत विजयाची नोंद केली. सुनील नरीन, आंद्रे रसेल, अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंग यांच्या चौकार-षटकारांच्या जोरावर KKR ने आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या उभी केली. दिल्ली कॅपिटल्सला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांच्याकडून कर्णधार रिषभ पंत व त्रित्सान स्तब्स यांनी अर्धशतकी खेळी करून झुंज दिली, पंरतु KKR वर विजय मिळवण्यासाठी ती अपूरी ठरली.  कोलकाताने विजयासह Point Table मध्ये अव्वल स्थान पटकावले. 


विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर KKR चा  नाद खुळा खेळ पाहायला मिळाला. KKR ने आज त्यांच्या आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभी केलीच, शिवाय आजच्या त्यांच्या ७ बाद २७२ धावा या आयपीएलमधील दुसऱ्या सर्वोत्तम धावसंख्या ठरल्या. सुनील नरीनने ७ चौकार व ७ षटकारांसह ३९ चेंडूंत ८५ धावांची वादळी खेळी केली. त्याला १८ वर्षांच्या अंगकृषस त्याने १०४ धावांची भागीदारी केली. अंगकृष २७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला. रसेलने त्याची मसल पॉवर दाखवली आणि १९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४१ धावा केल्या. रिंकूने ८ चेंडूंत २६ धावा चोपल्या. 


दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( १०) व मिचेल मार्श ( ०) यांना अनुक्रमे वैभव अरोरा व मिचेल स्टार्क यांनी माघारी पाठवले. वैभवने त्याच्या दुसऱ्या षटकात अभिषेक पोरेलला भोपळ्यावर बाद केले.  स्टार्कच्या भन्नाट चेंडूवर वॉर्नर ( १८) त्रिफळाचीत झाल्याने दिल्लीची अवस्था ४ बाद ३३ धावा अशी झाली.  पण, रिषभ पंत आणि त्रिस्तान स्तब्स यांनी डावाला आकार दिला. रिषभने वेंकटेश अय्यरच्या एका षटकात २८ धावा कुटून २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या पर्वातील हे महागडे षटक ठरले. मात्र, पुढच्या षटकात वरुण चक्रवर्थीने रिषभला ( ५५) व अक्षर पटेलला ( ०) माघारी पाठले. 


स्तब्सने ३२ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ५४ धावा केल्या आणि वरुणने त्याची विकेट घेतली. त्यानंतर नरीनने सुमित कुमार ( ७) याला व वैभवने राशिख सलामला ( १) बाद केले.  दिल्लीचा संपूर्ण संघ १७.२ षटकांत १६६ धावांवर गडगडला आणि कोलकाताने १०६ धावांनी हा सामना जिंकला. 
 

Web Title: IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update :  KKR NOW BECOMES TABLE TOPPERS, beat DC by 106 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.