18 Six, 22 Fours! नरीन, रघुवंशी, रसेल, रिंकूची फटकेबाजी; IPL इतिहासातील दुसरी सर्वोच्च खेळी

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील त्यांच्या सर्वोच्च धावसंख्या आज उभ्या केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 09:30 PM2024-04-03T21:30:55+5:302024-04-03T21:31:08+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : KKR have surpassed ( 272 runs) RCB to hold now the record of 2nd highest IPL score, Angkrish Raghuvanshi ( 54), Sunil Narine ( 85), Rinku Singh ( 26) | 18 Six, 22 Fours! नरीन, रघुवंशी, रसेल, रिंकूची फटकेबाजी; IPL इतिहासातील दुसरी सर्वोच्च खेळी

18 Six, 22 Fours! नरीन, रघुवंशी, रसेल, रिंकूची फटकेबाजी; IPL इतिहासातील दुसरी सर्वोच्च खेळी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील त्यांच्या सर्वोच्च धावसंख्या आज उभ्या केल्या. सुनील नरीनच्या  ( Sunil Narine ) स्फोटक सुरूवातीला १८ वर्षांच्या अंगकृष रघुवंशीची दमदार साथ मिळाली. दोघांनी ४८ चेंडूंत १०४ धावांची वादळी भागीदारी करून दिल्ली कॅपिटल्सची कंबर मोडली. Angkrish Raghuvanshi ने आज शाहरुख खान व गौतम गंभीरचीही शाबासकी मिळवली. आंद्रे रसेलने शेवटच्या षटकांत कॅरेबियन तडका देताना कोलकाता नाईट रायडर्ससाठी मोठी धावसंख्या उभारून दिली. 


कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि नरीनने तो सार्थ ठरवला. त्याने  इशांत शर्माच्या एका षटकात २६ धावा कुटल्या. त्याची फटकेबाजी पाहून दिल्लीचे गोलंदाज रडकुंडीला आले. फिल सॉल्ट नॉन स्ट्राईक एंडवरून चौकार-षटकारांची आतषबाजी पाहत होता. एनरिच नॉर्खियाच्या पाचव्या षटकात सॉल्ट १८ धावांवर बाद झाला आणि कोलकाताला ६० धावांवर पहिला धक्का बसला. पण, नरीनचे वादळ काही थांबायचं नाव घेत नव्हते. त्याने २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पॉवर प्लेमध्ये KKR ने १ बाद ८८ धावा कुटल्या. यष्टींमागून रिषभ सीमापार जाणारे चेंडू पाहत राहिला. 


१८वर्षीय अंगकृष रघुवंशीनेही मनगटाचा सुरेख वापर करून खणखणीत षटकार खेचायला सुरुवात केले.  नरीनचा झंझावात १३व्या षटकात थांबवण्यात मिचेल मार्शला यश आले त्याने ७ चौकार व ७ षटकारांसह ३९ चेंडूंत ८५ धावांची खेळी केली. अंगकृषसह त्याने ४८ चेंडूंत १०४ धावा जोडल्या. अंगकृषने २५ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि KKR कडून अनकॅप्ड खेळाडूने झळकावलेले हे वेगवान अर्धशतक ठरले. तो २७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावा करून माघारी परतला. आंद्रे रसेलने षटकाराची परंपरा कायम राखताना १६ षटकांत संघाला २०५ पर्यंत पोहोचवले. शेवटच्या ४ षटकांत आतषबाजी करून KKR ला सनरायझर्स हैदराबादचा २७७ धावांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती.


रसेल व श्रेयस अय्यर यांनी २६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. अय्यर ११ चेंडूंत १८ धावांवर बाद झाला. २३९ धावा होताच KKR ने आयपीएल इतिहासातील त्यांची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. रिंकू सिंगने १९व्या षटकात तीन खणखणीत षटकार खेचले. रिंकू ८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने २६ धावांवर झेलबाद झाला.  २०व्या षटकात इशांत शर्माला गोलंदाजीला आणले गेले आणि त्याने पहिलाच चेंडू अप्रतिम यॉर्कर टाकला आणि १९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४१ धावा करणाऱ्या रसेलचा दांडा उडाला.  कोलकाताने ७ बाद २७२ धावा केल्या. ही आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.

 

Web Title: IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : KKR have surpassed ( 272 runs) RCB to hold now the record of 2nd highest IPL score, Angkrish Raghuvanshi ( 54), Sunil Narine ( 85), Rinku Singh ( 26)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.