१० चेंडूंत कुटल्या ४८ धावा! Sunil Narine चे वेगवान अर्धशतक, इशांतच्या ६ चेंडूंत २६ धावा, Video 

मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केल्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्स विशाखापट्टमण येथे कोलकाता नाईट रायडर्सला भिडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 08:04 PM2024-04-03T20:04:58+5:302024-04-03T20:05:13+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : FIFTY FOR SUNIL NARINE from just 21 balls, 6 6 4 0 6 4 (26 Runs) to Ishant Sharma, Watch Video  | १० चेंडूंत कुटल्या ४८ धावा! Sunil Narine चे वेगवान अर्धशतक, इशांतच्या ६ चेंडूंत २६ धावा, Video 

१० चेंडूंत कुटल्या ४८ धावा! Sunil Narine चे वेगवान अर्धशतक, इशांतच्या ६ चेंडूंत २६ धावा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : सुनील नरीनने ( Sunil Narine ) आज दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना सोलून काढले. कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीराने इशांत शर्माच्या एका षटकात २६ धावा कुटल्या. त्याची फटकेबाजी पाहून दिल्लीचे गोलंदाज रडकुंडीला आले. 


मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केल्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्स विशाखापट्टमण येथे कोलकाता नाईट रायडर्सला भिडणार आहे. DC चा माजी कर्णधार श्रेयस अय्यर यंदा KKR चे नेतृत्व सांभाळतोय, त्यामुळे ही लढत अधिक चुरशीची अपेक्षित आहे. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अंगक्रिष रघुवंशी याचे KKR च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे.  दिल्लीच्या ताफ्यात मुकेश कुमारच्या दुखापतीमुळे सुमित कुमारचा समावेश करण्यात आला आहे.

सुनील नरीन आणि फिल सॉल्ट यांनी KKR ला स्फोटक सुरूवात करून दिली. नरीनने चौथ्या षटकात इशांत शर्माला ६,६,४,०,६,४ असे फटके खेचले. एनरिच नॉर्खियाच्या पाचव्या षटकात सॉल्टचा झेल डेव्हिड वॉर्नरने टाकला, परंतु पुढच्याच चेंडूवर त्रिस्तान स्तब्सने अफलातून झेल घेतला. सॉल्ट १८ धावांवर बाद झाला आणि कोलकाताला ६० धावांवर पहिला धक्का बसला. नरीनने २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ६ चौकार व ४ षटकार खेचले. 

दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, रिषभ पंत, मिचेल मार्श, त्रिस्तान स्तब्स, अक्षर पटेल, सुमीत कुमार, राशिख सलाम, एनरिच नॉर्खिया, इशांत शर्मा, खलील अहमद; इम्पॅक्ट खेळाडू - पोरेल, कुशाग्र, दुबे, ललित व फ्रेझर-मॅकगर्क

कोलकाता नाईट रायडर्स - फिल सॉल्ट, सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, अंगक्रिष रघुवंशी, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्कस अनुकूल रॉय, हर्षित राणा; इम्पॅक्ट खेळाडू - सुयश, अनुकुल, पांडे, अरोरा व गुरबाज  
 

Web Title: IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : FIFTY FOR SUNIL NARINE from just 21 balls, 6 6 4 0 6 4 (26 Runs) to Ishant Sharma, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.