४,६,६,४,४,४! Rishabh Pant ची एका षटकात फटकेबाजी, पण वरुण चक्रवर्थीने मॅच फिरवली, Video 

DC चा कर्णधार रिषभ पंतने ( Rishabh Pant) तुफान फटकेबाजी करून संघाच्या आशा कायम राखल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 11:02 PM2024-04-03T23:02:38+5:302024-04-03T23:02:54+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : 4,6,6,4,4,4 by Rishabh Pant in a single over against Venkatesh Iyer; he scored 55 runs from just 24 balls, Video  | ४,६,६,४,४,४! Rishabh Pant ची एका षटकात फटकेबाजी, पण वरुण चक्रवर्थीने मॅच फिरवली, Video 

४,६,६,४,४,४! Rishabh Pant ची एका षटकात फटकेबाजी, पण वरुण चक्रवर्थीने मॅच फिरवली, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : कोलकाता नाईट रायडर्सच्या २७२ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचे ६ फलंदाज तंबूत परतले आहेत. DC चा कर्णधार रिषभ पंतने ( Rishabh Pant) तुफान फटकेबाजी करून संघाच्या आशा कायम राखल्या होत्या. पण, वरुण चक्रवर्थीने सलग दोन चेंडूंत विकेट्स घेऊन KKR चा विजय जवळपास पक्का केला. रिषभने ट्वेंटी-२०त ४५०० धावांचा टप्पा आज ओलांडला.


विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर KKR चा  नाद खुळा खेळ पाहायला मिळाला. सुनील नरीन, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग यांनी DCच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला.  दिल्लीची सुरुवात काही खास झाली नाही. पृथ्वी शॉ ( १०) व मिचेल मार्श ( ०) यांना अनुक्रमे वैभव अरोरा व मिचेल स्टार्क यांनी माघारी पाठवले. वैभवने त्याच्या दुसऱ्या षटकात अप्रतिम बाऊन्सरवर अभिषेक पोरेलला भोपळ्यावर बाद केले.  स्टार्कच्या भन्नाट चेंडूवर वॉर्नर ( १८) त्रिफळाचीत झाल्याने दिल्लीची अवस्था ४ बाद ३३ धावा अशी झाली.  


पण, रिषभ पंत आणि त्रिस्तान स्तब्स यांनी चांगली फटकेबाजी केली, दिल्लीच्या कर्णधाराने २३ चेंडूंत सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. रिषभने वेंकटेश अय्यरच्या एका षटकात २८ धावा कुटल्या आणि यंदाच्या पर्वातील हे महागडे षटक ठरले. मात्र, पुढच्या षटकात वरुण चक्रवर्थीने रिषभला ( ५५) व अक्षर पटेलला ( ०) माघारी पाठवल्याने दिल्लीची अवस्था ६ बाद १२६ झाली. 
 

Web Title: IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : 4,6,6,4,4,4 by Rishabh Pant in a single over against Venkatesh Iyer; he scored 55 runs from just 24 balls, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.