Prithvi Shaw house : पृथ्वी शॉ याचे २० कोटींचं ड्रीम होम; वांद्रेतील आलिशान घराची करा सफर

Prithvi Shaw house :  मुंबईच्या हायफाय वांद्रे येथे भारतीय सलामीवीर पृथ्वी शॉ याने स्वप्नाचे घर खरेदी केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 08:27 PM2024-04-10T20:27:21+5:302024-04-10T20:27:43+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Delhi Capital Batter Prithvi Shaw Shares Pictures Of His Fat Purchase; Buys 20 Cr 'Dream House' In Bandra, photo | Prithvi Shaw house : पृथ्वी शॉ याचे २० कोटींचं ड्रीम होम; वांद्रेतील आलिशान घराची करा सफर

Prithvi Shaw house : पृथ्वी शॉ याचे २० कोटींचं ड्रीम होम; वांद्रेतील आलिशान घराची करा सफर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Prithvi Shaw house :  मुंबईच्या हायफाय वांद्रे येथे भारतीय सलामीवीर पृथ्वी शॉ याने स्वप्नाचे घर खरेदी केले आहे. एकेकाळी विरारहून फास्ट लोकल पकडून क्रिकेटच्या सरावासाठी मुंबईत येणाऱ्या पृत्वीने २० कोटींत हे घर आधीच विकत घेतले होते, पण आता ते बांधून पूर्ण झाले आहे. पृथ्वी लहानपणापासूनच प्रतिभावान खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने शालेय क्रिकेटमध्ये डावात ५००हून अधिक धावा केल्या होत्या आणि नंतर २०१८ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत नेतृत्व करताना भारताला जेतेपद पटकावून दिलं होतं. 


पृथ्वीने घर खरेदी केल्यानंतर, काम सुरू होण्यापूर्वीचा फोटो पोस्ट केला होता आणि त्यानंतर आता ते घर पूर्ण झाले आहे. त्याचे फोटे त्याने पोस्ट केले आहेत. फोटो शेअर करताना पृथ्वी शॉने लिहिले, स्वप्नं पाहण्यापासून ते पूर्ण करण्यार्यंतचा प्रवास अवास्तव होता. हे  स्वप्न प्रत्यक्षात उतल्याचा आनंद आहे आमइ मी खूप कृतज्ञ आहे! गुड टाइम्स रोल करू द्या.


पृथ्वीचे नवीन घर आलिशान इंटेरिअरने अतिशय सुंदर दिसत होते. त्याच्या नवीन घरात पोझ देताना त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे. पृथ्वीने लिहिलं की, स्वतःच्या घराची चावी फिरवताना वेगळाच आवाज येतो. 


IPL 2023 मध्ये खराब कामगिरीनंतर पृथ्वी शॉला प्लेइंग ११ मधून वगळण्यात आले होते. आयपीएलच्या २०२४ मध्ये त्याला दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या दोन सामन्यांत संधी दिली नाही. पण, चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध संधी मिळताच त्याने २७ चेंडूंत ४३ धावा चोपल्या.  त्यानंतर  वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने ४० चेंडूत ६६ धावा केल्या.

 

Web Title: IPL 2024, Delhi Capital Batter Prithvi Shaw Shares Pictures Of His Fat Purchase; Buys 20 Cr 'Dream House' In Bandra, photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.