Join us  

Marcus Stoinis चे वादळी शतक! लखनौ सुपर जायंट्सचा CSK वर रोमहर्षक विजय 

ऋतुराज गायकवाडच्या शतकाला लखनौ सुपर जायंट्सच्या मार्कस स्टॉयनिसने शतकानेच उत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 11:27 PM

Open in App

IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live :  ऋतुराज गायकवाडच्या शतकाला लखनौ सुपर जायंट्सच्या मार्कस स्टॉयनिसने शतकानेच उत्तर दिले. चेन्नई सुपर किंग्सच्या २१० धावांचा पाठलाग करताना LSG ची आघाडीची फळी अपयशी ठरली. पण, स्टॉयनिसने देवदत्त पडिक्कल व निकोलस पूरन यांच्यासह अर्धशतकी भागीदारी करून LSG च्या विजयाच्या आशा कायम राखल्या. त्याने आयपीएलमधील त्याचे पहिले शतक पूर्ण केले. त्याच्या शतकाच्या जोरावर LSG ने रोमहर्षक विजयाची नोंद केली आणि ६ विकेट्सने मॅच जिंकून Point Table वर चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. 

अजित आगरकर भाई T20 WC में सिलेक्ट करो प्लीज! CSK च्या खेळाडूसाठी सुरेश रैनाची शिफारस

दीपक चहरच्या पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉक ( ०) त्रिफळाचीत झाला. पण कर्णधार लोकेश राहुल व मार्कस स्टॉयनिस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, मुस्ताफिजूर रहमानने पाचव्या षटकात लोकेशला ( १६) माघारी पाठवून मोठा धक्का दिला. स्टॉयनिसने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला १० षटकांत २ बाद ८३ धावांपर्यंत पोहोचवले. ११व्या षटकात ऋतुने मथिशा पथिराणाला गोलंदाजीला आणले आणि त्याने शेवटच्या चेंडूवर देवदत्त पडिक्कलचा ( १३) १५१kmph वेगाने टाकलेल्या चेंडूवर त्रिफळा उडवला.  LSG ने १२.२ षटकांत फलकावर १०० धावा उभ्या केल्या. स्टॉयनिस CSK ची डोकेदुखी वाढवत होता. त्याला निकोलस पूरनची चांगली साथ मिळताना दिसली. LSG ला ३६ चेंडूंत ८७ धावा करायच्या होत्या. स्टॉयनिस व पूरन यांनी २६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि CSK चे टेंशन वाढवले. शार्दूलने टाकलेल्या १६व्या षटकात पूरनने ६,४,६,२,१ अशा १९ धावा कुटल्या. २४ चेंडूंत ५४ धावा असा सामना लखनौच्या बाजूने झुकताना दिसला. स्टॉयनिस व पूरन यांची ७० ( ३४ चेंडू) धावांची भागीदारी पथिराणाने तोडली. पूरन १५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांवर शार्दूलच्या हाती झेल देऊन परतला.  

स्टॉयनिसने ५६ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह शतक पूर्ण केले आणि १२ चेंडूंत ३२ धावा असा सामना अधिक चुरशीचा झाला. पथिराणाच्या षटकात ४,१,४,४,०,२ अशा १३ धावा LSG च्या फलंदाजांनी चोपल्या. आता ६ चेंडू १७ धावा असा सामना LSGच्या पारड्यातच होता. स्टॉयनिसने पहिल्या दोन चेंडूंवर १० धावा कुटल्या. त्यात तिसरा चेंडू नो बॉल राहिला आणि स्टॉयनिसने त्यावरही चौकार खेचला.  free hit वर चौकार खेचून स्टॉयनिसने सामना संपवला. लखनौने १९.३ षटकांत ४ बाद २१३ धावा करून सामना जिंकला. स्टॉयनिस ६३ चेंडूंत १३ चौकार व ६ षटकारांसह नाबाद १२४ धावा केल्या. 

तत्पूर्वी, ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) हा CSK साठी शतक झळकावणारा पहिलाच कर्णधार ठरला. ऋतुराज व शिवम दुबे यांनी चौथ्या विकेटसाठी ४६ चेंडूंत १०४ धावा जोडल्या. शिवम २७ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकरांसह ६६ धावांवर रन आऊट झाला. ऋतुराज ६० चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह १०८ धावांवर नाबाद राहिला. महेंद्रसिंग  धोनीने १ चेंडूंत चार धावा करून चेन्नईला ४ बाद २१० धावांपर्यंत पोहोचवले. ऋतुराजच्या नाबाद १०८ धावा या चेन्नईकडून कर्णधार म्हणून सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.  यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने २०१९मध्ये RCB विरुद्ध नाबाद ८४ धावा केल्या होत्या.   

टॅग्स :आयपीएल २०२४चेन्नई सुपर किंग्सलखनौ सुपर जायंट्स