IPL 2024: लखनौविरुद्ध बंगळुरू विजयपथावर परतणार?

IPL 2024, LSG Vs RCB :अनेक स्टार्स खेळाडूंचा भरणा असलेला बंगळुरू संघ आयपीएल २४ मध्ये  विराट कोहलीचा अपवाद वगळता कामगिरीत माघारला. तीनपैकी एका सामन्यात त्यांना विजय मिळविता आला. मंगळवारी लखनौ संघाविरुद्ध त्यांची गाठ पडणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 06:19 AM2024-04-02T06:19:22+5:302024-04-02T06:19:43+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024: Bangalore return to Vijaypath against Lucknow? | IPL 2024: लखनौविरुद्ध बंगळुरू विजयपथावर परतणार?

IPL 2024: लखनौविरुद्ध बंगळुरू विजयपथावर परतणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू - अनेक स्टार्स खेळाडूंचा भरणा असलेला बंगळुरू संघ आयपीएल २४ मध्ये  विराट कोहलीचा अपवाद वगळता कामगिरीत माघारला. तीनपैकी एका सामन्यात त्यांना विजय मिळविता आला. मंगळवारी लखनौ संघाविरुद्ध त्यांची गाठ पडणार आहे. 

बंगळुरू
- फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाला कामगिरीत सातत्य राखावे लागेल. मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन यांच्याकडून योगदान अपेक्षित असेल.
-आघाडीची आणि मधील फळी अपयशी ठरल्याने दिनेश कार्तिक, अनुज रावत, महिपाल लोमरोर यांच्यावर विसंबून राहावे लागते. गोलंदाजांनी १०च्या सरासरीने धावा मोजल्या. 

लखनौ
- कर्णधार लोकेश राहुलच्या फिटनेसची चिंता कायम आहे. त्याच्या अनुपस्थितीत निकोलस पूरन नेतृत्व करतो. राहुल नेतृत्व करतो की इम्पॅक्ट खेळाडूच्या रूपात खेळतो, हे पाहावे लागेल.
- स्टोयनिस, दीपक हुडा आणि  देवदत्त पडिक्कल धावा काढण्यात अपयशी. मयंक यादव प्रतितास १५० वेगाने चेंडू टाकत आहे. चिन्नास्वामीवर वेगाची कमाल दाखविण्यास सज्ज असेल.

Web Title: IPL 2024: Bangalore return to Vijaypath against Lucknow?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.