Join us  

विराट 'मॅम' पण बोल! फोटोग्राफर्सनी अनुष्का शर्माला असं काय म्हटलं की कोहलीने उडवली खिल्ली  

IPL 2023 : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला त्यांच्या मुंबईतील रेस्ट्रॉरंटमध्ये मंगळवारी पार्टी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 4:05 PM

Open in App

IPL 2023 : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला त्यांच्या मुंबईतील रेस्ट्रॉरंटमध्ये मंगळवारी पार्टी दिली. मुंबई इंडियन्सविरुद्धची मॅच गमावल्यानंतर दुसऱ्या दिवशी विराट-अनुष्का RCBच्या सदस्यांसह जुहू येथीर रेस्ट्रॉरंटमध्ये आले.  जेवण करून ही जोडी रेस्टॉरंटमधून बाहेर पडताच तेथे अनेक फोटोग्राफर उभे होते. त्यापैकी एका फोटोग्राफरने चुकून अनुष्काला सर असे म्हणाला आणि ज्यावर विराट कोहलीने नंतर खिल्ली उडवली. 

नंतर तो गंमतीने म्हणाला की, मला विराट मॅमही म्हणा. यानंतर दोघेही खूप हसताना दिसले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. खरं तर, या दोघांचा एकत्र फोटो क्लिक करण्यासाठी सर्व फोटोग्राफर्स रेस्टॉरंटच्या बाहेर आतुरतेने वाट पाहत होते.  विराट आणि अनुष्का रेस्टॉरंटमधून बाहेर येताच सर्व फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली. चुकून एका फोटोग्राफरने अनुष्काला 'सर' म्हटले. मात्र, त्यानंतर त्यांनी माफीही मागितली. यावर विराट म्हणाला, विराट मॅमही बोलायला हवं, यावर दोघेही हसायला लागले आणि परत रेस्टॉरंटमध्ये गेले.

इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी फार चांगली झालेली नाही. या मोसमात त्यांनी ११ सामने खेळले असून ५ जिंकले आहेत, तर ६ सामन्यात संघाचा पराभव झाला आहे. RCB सध्या IPL 2023 च्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यांना या मोसमातील प्लेऑफसाठी पात्र ठरायचे असेल, तर संघाला त्यांचे उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. विराटने या मोसमात आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. विराटने या मोसमात ११ सामन्यांत ४२ च्या सरासरीने ४२० धावा केल्या आहेत. विराट व्यतिरिक्त फक्त फॅफ ड्यू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी फलंदाजीत आरसीबीमध्ये चांगली कामगिरी केली आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२३ऑफ द फिल्डविराट कोहलीअनुष्का शर्मा
Open in App