- अयाज मेमन
मोहाली : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध (आरसीबी) गुरुवारी होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्याआधी पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन तंदुरुस्त होईल का, याकडे पंजाब संघाचे लक्ष आहे. या सामन्यात पंजाबला आक्रमक फलंदाजीची गरज भासणार आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे धवन लखनौविरुद्ध खेळला नव्हता.
पंजाब किंग्स
३७ वर्षांचा शिखर धवन मैदानावर दिसेल? तो नसेल, तर पुन्हा सॅम करन नेतृत्व करेल.
अष्टपैलू सिकंदर रझा याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले, तर मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत, शाहरूख खान यांचेही विजयात योगदान.
सॅम करनचे फलंदाजीत योगदान नसल्याने आरसीबीविरुद्ध त्याला धावा काढाव्याच लागतील. अर्शदीप गोलंदाजीत भेदक.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
कर्णधार फाफ डुप्लेसीससोबत विराट सलामीला आणि मॅक्सवेल चौथ्या स्थानावर प्रभावी.
शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई यांनी स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली. मनोबल वाढविण्यासाठी विजयाची गरज.
पाचपैकी दोन विजयांमुळे आठव्या स्थानावर असलेल्या या संघाच्या गोलंदाजांना विजयाची जबाबदारी स्वीकारावी लागेल.