Join us  

IPL 2023, RCB vs SRH Live : विराट कोहली-फॅफ ड्यू प्लेसिसची १७२ धावांची भागीदारी; RCB पडली SRHवर भारी

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Live Marathi : विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस या जोडीने आज हैदराबादच्या मैदानावर वादळ आणले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 11:03 PM

Open in App

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Live Marathi : विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस या जोडीने आज हैदराबादच्या मैदानावर वादळ आणले. १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट व फॅफ यांनी पहिल्या विकेटसाठी १७२ धावांची अप्रतिम भागीदारी केली अन् सनरायझर्स हैदराबादचा पराभव निश्चित केला. हैदराबादच्या गोलंदाजांची RCBच्या सलामीवीरांनी निर्दयीपणे धुलाई केली. यंदाच्या पर्वातील त्यांनी सर्वाधिक तिसरी शतकी भागीदारी पूर्ण केली आणि यंदाच्या पर्वात जोडीने एकूण ८०० धावा जोडताना चार वर्षांपूर्वीचा मोठा विक्रमही मोडला. या विजयासह RCB ने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आणि प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. 

विराट कोहलीच्या शतकासमोर हैदराबादचा पालापाचोळा, मोडला रोहित शर्माचा विक्रम

 विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी दणदणीत सुरुवात करून दिली. दोघांची फटकेबाजी लाजवाब ठरली आणि त्यांचे टायमिंग कौतुकास्पद होते. भुवीने टाकलेल्या १५व्या षटकात विराटने अप्रतिम पुस्तकी फटके मारून ३ चौकार मिळवले अन् संघाला १५० धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी यंदाच्या पर्वात ८००+ धावांची भागीदारी केली आणि आयपीएल इतिहासात पहिल्या विकेटसाठी एका पर्वातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी जॉनी बेअरस्टो व डेव्हिड वॉर्नर यांनी २०१९च्या पर्वात १० सामन्यांत ७९१ धावा जोडल्या होत्या. विराट ६३ चेंडूंत १०० धावांवर झेलबाद झाल आणि त्याच्या या खेळीत १२ चौकार व ४ षटकारांचा समावेश होता. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हे त्याचे सातवे शतक ठरले अन् त्याने रोहित शर्मा व लोकेश राहुल ( 6 ) यांचा विक्रम मोडला.  

फॅफ ड्यू प्लेसिस ४७ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ७१ धावांवर बाद झाला, परंतु तोपर्यंत RCBच्या हातात सामना आला होता. ब्रेसवेल व मॅक्सवेल यांनी विजय निश्चित केला. RCB ने १९.२ षटकांत २ बाद १८७ धावा करून मॅच जिंकली. तत्पूर्वी, हेनरिच क्लासेनने ( Heinrich Klaasen) शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने ५ बाद १८६ धावा केल्या. क्लासेन आणि एडन मार्कराम यांनी ७६ धावांची ( ५० चेंडू) भागीदारी केली. क्लासेनने ५१ चेंडूंत १०४ धावा केल्या आणि त्यात ८ चौकार व ६ षटकारांचा समावेश होता. हॅरी ब्रूकने नाबाद २७ धावा करताना हैदराबादला ५ बाद १८६ धावांपर्यंत पोहोचवले. 

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीएफ ड्यु प्लेसीसरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद
Open in App