Join us  

IPL 2023, RCB vs PBKS Live : बनवाबनवी! फॅफ ड्यू प्लेसिस Playing XI मध्ये, तरीही विराट कोहली कॅप्टन; जाणून घ्या झोल

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहली पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करताना आज दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 4:04 PM

Open in App

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहली पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करताना आज दिसला. पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीत RCBने नियमित कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले, परंतु नेतृत्व विराट करतोय. शिखर धवन आजही खेळत नसल्याने सॅम कुरन PBKSचे नेतृत्व करतोय आणि त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. फॅफ ड्यू प्लेसिस संघात असतानाही विराट टॉससाठी आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि किंग कोहलीने हा 'झोल' समजावून सांगितला आहे. 

विराटने ११ ऑक्टोबर २०२१ मध्ये RCBचे शेवटचे नेतृत्व केले होते आणि त्यानंतर  ५५६ दिवसांनी तो पुन्हा कॅप्टन म्हणून दिसल्याने चाहते खूश झाले. फलंदाजीवर परिणाम होत असल्याचे सांगून विराटने नेतृत्व सोडले होते. ड्यू प्लेसिस व विराट यांनी RCBला अपेक्षित चांगली सुरूवात करून दिली आणि या दोघांनी ६ षटकांत १०च्या सरासरीने धावा चोपल्या आहेत. फॅफ प्लेइंग इलेव्हनमध्ये असूनही विराट का कॅप्टन, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

विराटने सांगितले,''फॅफच्या बरगड्यांत दुखापत झाल्यामुळे तो क्षेत्ररक्षण करू शकत नाही आणि तो आज फक्त फलंदाज म्हणून खेळणार आणि दुसऱ्या इनिंग्जमध्ये विजयकुमार वैशाख त्याच्या जागी मैदानावर उतरणार आहे. या रणनीतीमुळे आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती आणि या खेळपट्टीचा व वातावरणाचा फायदा उचलायचा होता.''   

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली ( कर्णधार), फॅफ ड्यू प्लेसिस, महिपाल लोम्रोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, वनिंदू हसरंगा, सुयष प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पार्नेल, मोहम्मद सिराज ( Royal Challengers Bangalore XI: Virat Kohli (c), Faf du Plessis✈️, Mahipal Lomror, Glenn Maxwell✈️, Shahbaz Ahmed, Dinesh Karthik (wk), Wanindu Hasaranga✈️, Suyash Prabhudessai, Harshal Patel, Wayne Parnell✈️, Mohammed Siraj.) 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३एफ ड्यु प्लेसीसविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App