IPL 2023 PBKS vs RR: राजस्थान रॉयल्स आज घरचं मैदान सोडून गुवाहाटीमध्ये खेळणार; कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

IPL 2023 PBKS vs RR: राजस्थान विरुद्ध पंजाब किंग्सचा सामना गुवाहाटीमधील बारसपारा मैदानावर रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 02:57 PM2023-04-05T14:57:50+5:302023-04-05T15:10:10+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 PBKS vs RR: Rajasthan vs Punjab Kings match will be played at Barsapara ground in Guwahati. | IPL 2023 PBKS vs RR: राजस्थान रॉयल्स आज घरचं मैदान सोडून गुवाहाटीमध्ये खेळणार; कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

IPL 2023 PBKS vs RR: राजस्थान रॉयल्स आज घरचं मैदान सोडून गुवाहाटीमध्ये खेळणार; कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या खेळपट्टीवर राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सचा संघ विजयी लय कायम राखण्यासाठी आज मैदानात उतरतील. मात्र या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे पारडे काहीसे जड समजले जाते आहे. बारसपारा स्टेडियम हे दोन्ही संघांचे होमग्राउंड नाही. त्यामुळे खेळपट्टीची अजिबात जाण नसताना अंतिम एकादश निश्चित करण्याचे आव्हान दोन्ही संघांसमोर असेल.

राजस्थान रॉयल्स आज नेहमीप्रमाणे राजस्थानमधील सवाई मानसिंग या घरच्या मैदानावर खेळणार नसून आसाममधील गुवाहाटीच्या मैदानावर पंजाबविरुद्धचा सामना खेळणार आहे. राजस्थान विरुद्ध पंजाब किंग्सचा सामना गुवाहाटीमधील बारसपारा मैदानावर रंगणार आहे. विशेष म्हणजे हा पहिला आयपीएल सामना असेल, जो ईशान्य राज्यातील स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. यापूर्वी कधीही ईशान्येकडील राज्यांमध्ये एकही आयपीएलचे सामने खेळले गेले नव्हते. 

राजस्थान रॉयल्सने बार्सपारा स्टेडियमला ​​त्यांचे दुसरे होम ग्राउंड बनवले आहे. राजस्थान रॉयल्स संघाला पूर्वोत्तर राज्यांमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन द्यायचे आहे. तो म्हणतो की ईशान्येकडील राज्यांमध्ये क्रिकेटची आवड फारच कमी आहे. यामुळे राजस्थानने गुवाहाटी हे दुसरे होम ग्राउंड म्हणून निवडले आहे. आसाम क्रिकेट असोसिएशननेही यासाठी राजस्थान रॉयल्सचे आभार देखील मानले आहेत. या निर्णयाबद्दल मी राजस्थान रॉयल्सचा खूप आभारी आहे, असे आसाम क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सचिव म्हणाले.

दरम्यान, दोन्ही संघांना प्रत्येकी एक सामना जिंकण्यात यश आले आहे. आता दोन्ही संघ आजचा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान सुधारण्याचा प्रयत्न करतील. पंजाब किंग्जने त्यांच्या पहिल्या सामन्यात केकेआरचा पराभव केला, तर राजस्थानला हैदराबादचा पराभव करण्यात यश मिळाले. पंजाब किंग्जचा संघ एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकलेला नाही, तर दुसरीकडे राजस्थान आयपीएलचा पहिला हंगाम जिंकण्यात यशस्वी ठरला होता. मात्र त्यानंतर राजस्थानचा संघ विजेतेपद मिळवू शकला नाही. संजू सॅमसन राजस्थानचा कर्णधार आहे तर शिखर धवन पंजाब किंग्जचा कर्णधार आहे.

पंजाब किंग्ज संभाव्य प्लेइंग XI

शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम कुरान, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग

राजस्थानसाठी नवदीप सैनी किंवा संदीप शर्मा 'इम्पॅक्ट प्लेअर'ची भूमिका बजावू शकतात.

राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग XI

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल

कागिसो रबाडा पंजाब किंग्जसाठी 'इम्पॅक्ट प्लेअर'ची भूमिका बजावू शकतो.

Web Title: IPL 2023 PBKS vs RR: Rajasthan vs Punjab Kings match will be played at Barsapara ground in Guwahati.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.