IPL 2023: १४ षटकार, २७ चौकार... लखनौने केली पंजाबची धुलाई, ९ वर्षांनी रचला नवा इतिहास

१५ वर्षांच्या काळात केवळ दोनच संघांना जमली अशी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 09:08 AM2023-04-29T09:08:09+5:302023-04-29T09:11:32+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 PBKS vs LSG creates big record with 14 fours 27 sixes 2nd highest score in IPL history | IPL 2023: १४ षटकार, २७ चौकार... लखनौने केली पंजाबची धुलाई, ९ वर्षांनी रचला नवा इतिहास

IPL 2023: १४ षटकार, २७ चौकार... लखनौने केली पंजाबची धुलाई, ९ वर्षांनी रचला नवा इतिहास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Highest Score, LSG: कॅरेबियन पॉवरहाऊस काइल मेयर्स आणि ऑसी अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस यांच्या आक्रमक खेळीमुळे लखनौ सुपर जायंट्सने शुक्रवारी रात्री पंजाब किंग्ज विरुद्ध इतिहास रचला. त्यांच्या दमदार खेळीच्या जोरावर IPL इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपरजायंट्सने पाच विकेट्सच्या मोबदल्यात 257 धावा केल्या. या मोसमातील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. पॉवरप्लेमध्ये मेयर्सने 24 चेंडूत 54 धावा केल्या तर त्यानंतर स्टॉयनिसने 40 चेंडूत 72 धावा केल्या आणि आयुष बडोनीने 24 चेंडूत 43 आणि निकोलस पूरनने 19 चेंडूत 45 धावा केल्या.

IPLचे टॉप-3 स्कोअर

  • 263/5 बंगलोर
  • 257/5 लखनौ
  • 248/3 बंगलोर


स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 2013 मध्ये केली होती. त्या सामन्यात ख्रिस गेलने 175 धावा केल्या. १५ वर्षात केवळ २ संघांनाच २५०च्या पुढे मजल मारता आली. बंगलोरच्या संघाने २५०च्या जवळपास येण्याचा प्रयत्न दुसऱ्यांदा केला होता पण त्यांचा डाव २४८ धावांवरच संपला.

राहुल वगळता सर्व फलंदाजांचा धुमधडाका

लखनौचा कर्णधार केएल राहुल फलंदाजांच्या आवडत्या खेळपट्टीवर चांगला खेळ करू शकला नाही. नऊ चेंडूत १२ धावा करून तो बाद झाला. त्यानंतर मेयर्सने पहिल्याच षटकात अर्शदीपला चार चौकार ठोकले. त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि चार षटकार मारले. मेयर्स बाद झाल्यानंतर स्टॉइनीस आणि बडोनी यांनी 47 चेंडूत 89 धावा जोडल्या. स्टॉइनिसने आपल्या खेळीत पाच षटकार आणि सहा चौकार लगावले. लखनौने शेवटच्या सहा षटकांत ७३ धावा केल्या. 13व्या षटकात स्टॉयनीस बाद झाला असता पण लाँग-ऑनवर झेल घेण्याच्या प्रयत्नात लियम लिव्हिंगस्टोनने सीमारेषेला स्पर्श केला. त्यामुळे सामना फिरला.

गोलंदाजांची धुलाई

तीन सामन्यांनंतर कर्णधार परतणाऱ्या शिखर धवनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. राहुल चहर वगळता त्यांच्या सर्व सहा गोलंदाजांनी प्रति षटकात दहापेक्षा जास्त धावा या सरासरीने धावा दिल्या. फॉर्मात असलेल्या अर्शदीप सिंगने चार षटकांत ५४ धावा दिल्या. कागिसो रबाडाने चार षटकांत ५२ धावा दिल्या, तरीही त्याला दोन विकेट मिळाल्या.

Web Title: IPL 2023 PBKS vs LSG creates big record with 14 fours 27 sixes 2nd highest score in IPL history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.