Join us  

IPL 2023: रोहित शर्मा आता सुखाने झोपणार, मनावरचे मोठे ओझे उतरले; RCB अन् KKRच्या सामन्यात नेमकं काय घडले?

IPL 2023: मनदीप सिंहने या रेकॉर्डमध्ये रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकला मागे टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 11:40 AM

Open in App

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा यष्टिरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिक आता मोकळा श्वास घेतील. कारण कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज मनदीप सिंहने आयपीएलमध्ये लाजिरवाणा विक्रम केला आहे. गुरुवारी आयपीएल २०२३च्या ९व्या सामन्यात आरसीबीविरुद्ध खाते न उघडता मनदीप सिंह बाद झाला.

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी केली. व्यंकटेश अय्यर बाद झाल्यानंतर चौथ्या षटकात मनदीप सिंह क्रीझवर आला. मनदीप सिंहला पहिल्याच चेंडूवर विलीने क्लीन बोल्ड केले. विलीचा आऊट स्विंग चेंडू मनदीप सिंहला समजला नाही आणि तो बचावासाठी गेला, पण तोपर्यंत चेंडू स्टंपला लागला होता.

शार्दूल, शाहरुख सोडा, सामना पाहायला आलेल्या 'या' तरुणीची रंगली चर्चा; तुम्ही ओळखलं ना?

सदर सामन्यात मनदीप सिंहने खाते न उघडताच आऊट होऊन आपल्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवला आहे. मनदीप सिंहची न उघडताच शून्यवर बाद होण्याची ही १५वी वेळ होती. मनदीप सिंहने या रेकॉर्डमध्ये रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकला मागे टाकले आहे. रोहित-कार्तिक दोघेही एकही घाव न करता १४-१४ वेळा बाद झाले आहेत. त्यामुळे रोहित आणि दिनेशच्या मनावरचे ओझे कमी झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

पियुष चावला, हरभजन सिंग, पार्थिव पटेल, अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडू हे खेळाडू एकही धावा न करता १३ वेळा बाद झाले, हे सर्व  तिसऱ्या स्थानावर आहेत. तर रशीद खान, सुनील नरेन, ग्लेन मॅक्सवेल, मनीष पांडे आणि गौतम गंभीर १२ वेळा खाते न उघडता बाद झाले. अमित मिश्रा, रविचंद्रन अश्विन, एबी डिव्हिलियर्स आणि शिखर धवन हे फलंदाज एकही धावा न करता १० वेळा बाद झाले आहेत. 

कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) नाट्यमय ठरलेल्या लढतीत तब्बल ८१ धावांनी विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी) हातातून सामना खेचून आणला.  प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर कोलकाताने अडखळत्या सुरुवातीनंतरही २० षटकांत ७ बाद २०४ धावा उभारल्या. यानंतर त्यांनी आरसीबीला १७.४ षटकांमध्ये केवळ १२३ धावांत गुंडाळले. 

शार्दूल ठाकूर आणि रहमानुल्लाह गुरबाझ यांचे आक्रमक अर्धशतक आणि वरुण चक्रवर्थी व सुयश शर्मा यांची शानदार फिरकी कोलकाताच्या विजयात निर्णायक ठरले. धावांचा पाठलाग करताना कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र, पाचव्या षटकात सुनील नरेनने कोहलीला बाद केले आणि यानंतर आरसीबीच्या फलंदाजीला गळती लागली. आरसीबीकडून कोणालाही खेळपट्टीवर फारवेळ तग धरता आला नाही. 

टॅग्स :रोहित शर्माआयपीएल २०२३दिनेश कार्तिक
Open in App